विद्यार्थ्यांनो लक्ष द्या..! आता पाठ्यपुस्तके विकत घेण्याची आवश्यकता नाही; अशी करा पहिली ते बारावीपर्यंतची पाठ्यपुस्तके डाऊनलोड………
मागील एकवर्षाहून अधिक काळ कोरोना महामारीने जगभर धुमाकूळ घातला आहे. या महामारीचा फटका सर्वच घटकांवर दिसू लागला आहे. या विषाणूचा सर्वात मोठा फटका हा शैक्षणिक क्षेत्रावर पडला आहे. मागच्या एकवर्षाहून अधिक काळ सरकार व शिक्षण विभागाला मोठं मोठे निर्णय घ्यावे लागले आहे. मागील वर्षी शैक्षणिक वर्ष सुरु असतानाच शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शैक्षणिक विभागाने सुद्धा परस्थितीपाहून अनेक वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. त्यातच आता विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून बालभारतीकडून आता पीडीएफ स्वरुपात पुस्तके उपलब्ध झाली आहेत.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न करत आहे. मागील शैक्षणिक वर्ष संपले असून आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. दरवर्षी 1 मे ला विद्यार्थ्यांचा निकाल असतो. मात्र, यंदा परिक्षाच झाल्या नाहीत त्यामुळे यंदाचा निकालही लागला नाही. पुढचे शैक्षणिक वर्ष कसे असेल याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. त्यातच पहिली ते 12 पर्यंतची पुस्तक पीडीएफ स्वरुपात ऑनलाईन उपलब्ध झाली आहेत.
अशी मिळवा ऑनलाईन पाठ्यपुस्तक :
▪️ पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx
▪️ या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर ईबालभारतीचे मुख्य पेज दिसेल. त्यावर सिल्याबस इअरमध्ये 2006 पासून 2020 पर्यंत वर्ष दिली आहेत. त्यामध्ये ज्या वर्षाचे पुस्तक हवे आहे. त्या वर्षाला क्लिक करा.
▪️ या पेजवर बुक टाईप्समध्ये टेक्स बुक, टिचर्स हँडबुक, वर्कबुक, ऑदर बुक व किशोर खंद असे विभाग दिले आहेत. त्यातून जे हवे त्याला क्लिक करावे लागेल.
▪️ यापुढे तुम्हाला क्लासमध्ये पहिली ते 12 पर्यंतचे वर्ग दिले आहेत. याबरोबर नो क्सास असे ही ऑप्शन दिले आहे. या क्लिक केल्यानंतर काहीच दिसत नाही.
▪️ मिडीयममध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, तेलगु, कन्नड, तमीळ, बंगली आदी भाषा दिल्या आहेत.
सब्जेकटस्मध्ये भाषा (भाषेची पुस्तके), गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, पर्यावरण ऑदर आदी पुस्तके दिली आहेत.
दरम्यान, मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही शिक्षण विभागाला सूचना येई पर्यंत शाळा आणि महाविधालये हे ऑनलाईन होणार असल्याचे सांगतले आहे. मात्र आदिवासी आणि दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यांच्या शिक्षणाचे काय होणार?, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.