इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा उर्वरित 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत खेळवण्यात येणार आहे. परंतु, त्याआधी आणि नंतर बरेच आंतरराष्ट्रीय सामने होणार असल्याने बऱ्याच देशांचे प्रमुख खेळाडू आयपीएलच्या उर्वरित मोसमाला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होते.
आयपीएलच्या मोसमासाठी आग्रही असणाऱ्या बीसीसीआयला (BCCI) परदेशी बोर्डाकडून झटके लागण्यास सर्वात झाले असून, या घोषणे आधीच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) आपले देशातील खेळाडू आयपीएलचे उरलेले सामने खेळणार नसल्याचे सांगितलं आहे. यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh) देखील आपण खेळाडूंना आयपीएलसाठी पाठवणार नसल्याचं स्पष्ट केलं होते.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू टी-20 वर्ल्ड कपआधी 3 ते 4 सीरिज खेळणार असून, त्यांचं युएईला जाने देखील कठीण झाले आहे. आयपीएल 2021 च्या हंगामात साधारणतः बांग्लादेशचे 2 खेळाडू, इंग्लंडचे 12 खेळाडू, तर ऑस्ट्रेलियाचे 18 दिगज्ज खेळाडूंचा सहभागी झाले आहेत.
एवढेच नाही तर कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) ही स्पर्धा 18 सप्टेंबरला संपणार आहे, त्यामुळे जर आयपीएल 19 किंवा 20 सप्टेंबरपासून सुरू होत असेल, तर वेस्ट इंडिजचे खेळाडूही क्वारंटाईनच्या नियमामुळे ते खेळाडू लगेच उपलब्ध होऊ शकणार नाहीत. मात्र असे असले तर बीसीसीआय कडून एक माहिती आले असून BCCI वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी बोलून CPL हि स्पर्धा 10 दिवस आधी खेळवण्याबाबत विनंती करणार असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, फक्त वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबरोबर नाही तर उर्वरित परदेशी बोर्डांसोबत देखील बीसीसीआय पुढच्या काही आठवड्यांमध्ये खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत चर्चा करणार असल्याचे सांगतले जाते.
हे 40 परदेशी खेळाडू यंदाचा मोसम मुकण्याची शक्यता! :
▪️ रॉयल चैलेंजर्स बैंगलोर : ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, एडम झम्पा, केन रिचर्डसन
▪️ चेन्नई सुपर किंग्स : मोईन अली, सॅम करन, जेसन बेहरनडोर्फ, ड्वेन ब्रावो
▪️ मुंबई इंडियन्स : क्रिस लिन, नॅथन कूल्टर नाइल, कायरन पोलार्ड
▪️ दिल्ली कैपिटल्स : स्टीव स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, क्रिस वोक्स, टॉम करन, सॅम बिलिंग्स, शिमरोन हेटमायर
▪️ पंजाब किंग्स : डेविड मलान, मोइजेस हेनरिक्स, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन, क्रिस गेल, निकोलस पूरन, फॅबियन एलन
▪️ राजस्थान रॉयल्स : मुस्तफिजुर रहमान, लियाम लिविंगस्टोन, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जॉस बटलर, एंड्रयू टाय
▪️ कोलकाता नाइट राइडर्स : शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, ऑयन मॉर्गन, बेन कटिंग, आंद्र रसेल
▪️ सनरायजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, जेसन होल्डर