देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा मोठा फटका बसला असून यंदाची संपूर्ण स्पर्धा रद्द करण्याचा महतवाचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलचा 14 हंगाम अखेर स्थगित करण्याची वेळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयवर आली आहे. राजीव शुक्ला यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सुरू असलेल्या आयपीएलचं पर्व सध्या तरी इथे थांबवण्यात येत आहे. परंतु पुन्हा हे सामने कधी घेतले जातील याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली नाही. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असताना पाहायला मिळत आहेत.
UPDATE: The Indian Premier League Governing Council (IPL GC) and Board of Control for Cricket in India (BCCI) in an emergency meeting has unanimously decided to postpone IPL 2021 season with immediate effect.
Details – https://t.co/OgYXPj9FQy pic.twitter.com/lYmjBId8gL
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2021
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतानाच अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएल सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. त्यानंतर आता हैदराबाद संघामध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आयपीएलचे या सिझनचे सामने थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
BREAKING: The BCCI has indefinitely suspended #IPL2021 pic.twitter.com/WAEDiCQIse
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 4, 2021
दरम्यान, आयपीएलचे आतापर्यंत 29 सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.
सर्व वाचकांना विनंती संपूर्ण माहिती लवकरच अपडेट होत आहे