गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीने बाधित असलेल्या बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे गंभीर परिस्थिती निर्माण झाले आहे.
तर राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, कोरोना लसींचा तुटवड्यामुळे देशात लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण होत असल्याचे सातत्याने पाहायला मिळत आहे.
देशात आता कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा पार पडत असून, या टप्प्या मध्ये 18 वर्षांवरील पात्र सर्वांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र, अनेकदा आपल्याला कोरोना लसीकरण केंद्र कुठे आहे, याची माहिती अनेकदा मिळत नाही.
मात्र आता चिंता नको, आता यापुढे कोरोना लस मिळवायची असेल किंवा कोरोना लसीकरण केंद्र घराजवळ आहे का, हे शोधायचे असेल, तर आपण फेसबुकच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे उपयोगी ठरू शकते. कारण यासंदर्भातील माहिती आता WhatsApp वर मिळणार आहे. त्यासाठी काय करायचे ते पाहूया…
वापरा या सोप्या पद्धती :
👉 तुम्ही राहता त्या ठिकाणी जवळपास कुठे कोरोना लसीकरण चालू आहे, याची माहीती MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअॅपवर देईल.
👉 आता MyGovIndia ने आपल्या ट्विटर हँडलवर केलेल्या पोस्टनुसार वापरकर्त्यांना 9013151515 वर ‘नमस्ते’ असं पाठवावं लागेल.
👉 यानंतर चॅटबॉट आपल्याला त्वरित स्वयंचलित (ऑटोमॅटिक) प्रतिसाद देईल व त्यानुसार तुम्हाला 6-अंकी पिन कोड टाकावा लागेल.
👉 लसीकरण केंद्रांच्या यादीसोबत MyGovIndia चॅटबॉटमध्ये आपल्याला कोविड-19 लस नोंदणीची लिंक मिळेल, जी आपल्याला थेट कोविनच्या वेबसाईटवर घेऊन जाईल.
👉 या वेबसाइटला भेट देऊन, आपण आपला फोन नंबर, ओटीपी आणि आयडी प्रूफ नंबर प्रविष्ट करुन नोंदणी करू शकता. आपण आरोग्य सेतु ॲप आणि कोविड सर्व्हिस पोर्टल किंवा उमंग ॲपवर जाऊन नोंदणी देखील करू शकता.
Find your nearest vaccination center right here, through the MyGov Corona Helpdesk Chatbot! Simply type ‘Namaste’ at 9013151515 on WhatsApp or visit https://t.co/D5cznbq8B5. Prepare, don't panic! #LargestVaccineDrive #IndiaFightsCorona pic.twitter.com/qbfFlr5G0T
— MyGovIndia (@mygovindia) May 1, 2021
👉 हेल्प डेस्क हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांना सपोर्ट करतो. तसेच एखादी व्यक्ती हिंदीमध्ये संदेश पाठवून भाषा सेट करू शकते. MyGovIndia ने आपल्या ट्विटर हँडलवर या बद्दल माहिती दिली आहे आणि संपूर्ण प्रक्रिया देखील स्पष्ट केली आहे.