अवघ्या 97 रुपयांमध्ये मिळणार या कंपनीचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन; रोज 2 जीबी डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग!
भारत देशातील एकमेव अशी सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने आता पर्यंत खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ पासून ते एअरटेल आणि वोडाफोन आयडियापर्यंत सर्वांना जोरदार टक्कर दिली आहे. सविस्तर जाणून घेऊया या कंपनीच्या 97 रुपयांच्या प्लॅन्सबाबत……
सरकारी टेलिकॉम कंपनी म्हणजे अर्थातच बीएसएनएल, हे कंपनी आजही खासगी कंपनी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांना जोरदार टक्कर देत आहे. याच्या मागे सर्वात सर्वात कारण ते म्हणजे, बीएसएनएलचे स्वस्त प्रीपेड प्लान आहेत…..
आज आम्ही तुम्हाला अशाच एका सर्वांत स्वस्त प्रीपेड प्लानसंबंधी माहिती देत आहोत. हा प्लान फक्त बीएसएनएलकडे आहे. या प्लानची किंमत 97 रुपये आहे. या प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे हा प्लान जवळपास सर्वच सर्कल मध्ये उपलब्ध आहे. जाणून घ्या प्लानची सविस्तर माहिती.
बीएसएनएलचा 97 रुपयांचा सर्वांत स्वस्त प्रीपेड प्लान
बीएसएनएलच्या या स्वस्त प्रीपेड प्लानचे खास वैशिष्ट्ये आहे ते म्हणजे यात तुम्हला भरपूर डेटा दिला जातो. या प्लानमध्ये तुम्हाला 18 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यासोबतच रोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच 18 दिवसांसाठी एकूण 38 जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी, रोमिंग कॉलिंग दिली जाते. सोबतच रोज 100 एसएमएस दिले जाते. या प्लानमध्ये ग्राहकांना आणखी काही नवनवीन सुविधा देखील दिल्या जातात.
असच काहीसा प्लॅन जिओ चा देखील आहे
जिओ किंवा दुसरी खाजगी कंपनीकडे 97 रुपयांचा कोणताही प्लान नाही. जिओकडे हि सुविधेचा सर्वात स्वस्त प्लान हा 149 रुपया मध्ये आहे. यात जिओ ग्राहकांना 24 दिवसांची वैधता दिली जाते. तर तसेच रोज 1 जीबी डेटा दिला जातो. यात एकूण 24 जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस दिले जाते. तर यामध्ये जिओ अँपचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाते.
एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचा 149रुपयांचा प्लान
वोडाफोन आयडिया आणि एअरटेलचा प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. वोडाफोन आयडियाच्या प्लानमध्ये एकूण 3 जीबी डेटा आणि एअरटेलच्या प्लानमध्ये एकूण 2 जीबी डेटा दिला जातो. यात फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएस दिले जातात. वोडाफोनच्या या प्लानमध्ये Vi Movies & TV Basic चे फ्री अँक्सेस दिले जाते. एअरटेलच्या या प्लानमध्ये 1 महिन्याचे Prime Video चे मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, Free Hellotunes, Wynk Music, आणि Airtel Xstream चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते