आता बनवा आपल्या स्वप्नातील घर! ‘या’ बँका देते आहे सर्वात स्वस्त होमलोन; एकदा पहाच…
कोरोना महामारी पाहता तर तसेच सद्यच्या स्थितित रिअल इस्टेटच्या किंमतींमध्येम मोठी घसरण झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच कर्जावरील व्याजदरदेखील घटलेले आहेत असे म्हणायला काय हरकत नाही. असे केल्यास तुम्ही देखील दोन्ही आघाड्यांवर मोठी बचत करू शकता.
मागील काही काळापासून रिअल इस्टेटमधील मागणीत मोठी प्रमाणात घट झाली आहे. हे क्षेत्र मंदीचा सामना करते आहे. यामुळे घरांच्या किंमतीमध्ये चांगलीच घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत ज्या नागरिकांना घराची करायची आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. घर विकत घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी दोन्ही प्रकारे फायदा होऊ शकतो.
एक तर घरांच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर दुसरीकडे बॅंकेच्या गृहकर्जाच्या व्याजदरांत मोठी घट झालेली आहे. यामुळे गृहकर्जदेखील स्वस्तात उपलब्ध आहे. यामुळे घर विकत घेणाऱ्यांसाठी सध्या दुहेरी फायदा आहे.
कोणत्या बॅंकेने सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून दिले आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेऊया……
कोटक महिंद्राचा सर्वात स्वस्त गृहकर्ज
कोटक महिंद्रा बॅंकेने गृहकर्जावर 6.65 टक्के व्याजदराची ऑफर दिली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या गृहकर्जावरील हा सर्वात कमी व्याजदर आहे. तुमच्या पैशांची बचत लक्षात घेता हा सर्वात चांगला आणि फायदेशीर पर्याय आहे. कारण सर्वसाधारणपणे गृहकर्ज हे 15 वर्षांपासून ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले जाते. त्यामुळे व्याजापोटी तुम्हाला मोठी रक्कम बॅंकेला द्यावी लागते.
सर्व फ्लोटिंग-रेटचे गृहकर्ज हे बेंचमार्कशी निगडित असते. कारण बहुतांश बॅंकांसाठी रिझर्व्ह बॅंकेचे व्याजदर फ्लोटिंग रेटने असतात.
याआधी एसबीआयचे गृहकर्ज होते स्वस्त
याआधी मार्च महिन्यापर्यत देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे गृहकर्ज (SBI) सर्वात स्वस्त होते. स्टेट बॅंक आपल्या गृहकर्जावर 6.70 टक्के व्याजदराची आकारणी करत होती. मात्र 1 एप्रिलपासून बॅंकेने आपले गृहकर्जावरील व्याजदर वाढवून 6.95 टक्क्यांवर नेले आहेत. त्यामुळे कोटक महिंद्रा बॅंकेचे गृहकर्जावरील व्याजदर हे आता सर्वात स्वस्त व्याजदर आहेत.
आयसीआयसीआय आणि एचडीएफसी दुसऱ्या क्रमांकावर
स्वस्त गृहकर्जाचा विचार करता आयसीआयसीआय बॅंक (ICICI) आणि एचडीएफसी बॅंक (HDFC)हे आणखी काही पर्याय आहेत. आयसीआयसीआय बॅंक 6.70 टक्के इतके व्याजदर गृहकर्जावर आकारते आहे. तर एचडीएफसी बॅंकदेखील 6.70 टक्क्यांच्या व्याजदराने गृहकर्ज देते आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे बॅंक ऑफ बडोदा. बॅंक ऑफ बडोदा 6.75 टक्के व्याजदराने गृहकर्ज देते आहे. त्यानंतर पंजाब नॅशनल बॅंकेचा क्रमांक लागतो. पीएनबी 6.80 टक्के व्याजदर गृहकर्जावर आकारते आहे.
कोटक महिंद्राच्या गृहकर्जाला अर्ज कसा कराल
कोटक महिंद्रा बॅंकेच्या वेबसाईटवर चार स्टेप्समध्ये ही प्रक्रिया देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये घराचा शोध आहे. बॅंकेने विविध शहरांमधील मंजूर केलेल्या गृहप्रकल्पांची यादी दिली आहे. कोटक महिंद्रा बॅंकेने 22 शहरांमधून 2000पेक्षा जास्त गृहप्रकल्पांना मंजूरी दिली आहे. या मंजूरी मिळालेल्या गृहप्रकल्पांमधूनच तुम्हाला घरखरेदी करावी लागणार आहे.
यानंतर तुम्हाला तुमचा ईएमआय लक्षात घ्यावा लागेल. जर तुम्ही 50 लाख रुपयांचे गृहकर्ज 20 वर्षांसाठी 6.65 टक्के व्याजदराने घेतले तर यासाठी तुमचा ईएमआय 37,722 रुपये इतका असेल. यानंतर तुम्हाला होम लोन तज्ज्ञांशी चर्चा केली पाहिजे. त्यात तुमच्या सर्व शंकांचे निरसन होते. शेवटच्या टप्प्यात तुम्हाला बॅंकेच्या बेवसाईटवर गृहकर्जासाठी अर्ज करायचा आहे. यामध्ये तुम्हाला स्वत:ची पूर्ण माहिती द्यावी लागेल. अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सुलभरित्या तुमचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
चला तर आता तुमच्या आवडीची बँक निवडा आणि होमलोन घेऊन तुमचं स्वप्नातील घर बनवा!
टिपणी : वरील दिलेल्या लेख हा आरबीआयच्या धोरणानुसार बदलू शकते, परंतु बरेच काही नाही. आपल्या सिबिल स्कोअर, दस्तावेजावर आधारित कर्जे मिळतात. हे दर सर्वात कमी आहेत, परंतु यासाठी अनेक अटी आहेत. हे दर आपल्या सिबिल स्कोअर, दस्तावेजावर आधारित आहेत. तसेच जेव्हा आपण कर्ज घेता तेव्हा आपल्याला त्याबद्दल आधीपासूनच माहिती असावी.