केंद्राकडून पेन्शनच्या नियमात बदल; रिटायरमेंट नंतर घ्या ‘ही’ खबरदारी नाहीतर होईल पेन्शन बंद!
एखाद्या ठिकाणी पूर्ण आयुष्यभर काम केल्यानंतर येतो निवृत्तीचा दिवस! अनेक वयस्कर लोकांसाठी हे दिवस अवघड असतात. मिळणारी पेन्शन आणि त्याचे काही नियम हे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे असते. केंद्र सरकारने या पेन्शनच्या नियमात सुधारणा केल्या आहेत.
जर तुम्हाला याविषयी काहीही माहिती नसेल तर जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही निवृत्त झाल्यानंतर काही खबरदारी घेतली नाही तर, तुमची पेन्शन देखील बंद होऊ शकते. अशा पद्धतीचे नियम सरकारने बदलले आहेत.
अनेक लोक सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन चे रिटायर अधिकारी असतात. या संस्था आपल्या देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. देशाची सुरक्षा ही कुठल्याही नागरिकांपेक्षा महत्त्वाचे असते. या संस्थेमधून निवृत्त झालेले अधिकारी सेवेत असताना देखील काही नियमांचे पालन करतात.
सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र, त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती बाहेर तर जाणार नाही ना? यावर आपल्या देशाची सुरक्षा अवलंबून असते. केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षिततेसाठी अशा संस्थेची संलग्न असणाऱ्या अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर काही नियम घातले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांची पेन्शन बंद करण्यात येणार आहे.
या नियमानुसार, सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स ऑर्गनायझेशनचे रिटायर्ड अधिकारी त्या संघटनेच्या प्रमुखांच्या परवानगीशिवाय संस्थेशी संबंधित काहीही प्रकाशित करू शकणार नाहीत. परवानगीशिवाय त्यांना कोणताही कंटेंट प्रकाशित करता येणार नाही, आणि तसे झाले तर त्यांची पेन्शन बंद होईल.
अनेकदा अधिकारी स्वतःच्या नोकरीसंबंधी किंवा आलेले अनुभव आणि त्यास संबंधी पुस्तके प्रकाशित करतात किंवा इतर ठिकाणी मुलाखती देताना त्याचा उल्लेख करतात.
हा कन्टेन्ट बाहेर प्रकाशित करावा की नाही, यासंबंधी त्या संस्थेच्या प्रमुखांशी चर्चा करून संवेदनशील कन्टेन्ट आहे की नाही यावर निर्णय होणार आहे.
त्यानुसार संघटनेच्या क्षेत्राशी संबंधित काही गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. की नाही यावर ते अधिकारी निर्णय घेतील. डी ओ पी टी ने केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 यामध्ये आणखी अतिरिक्त एक कलम जोडला आहे.
त्यानुसार, सेवानिवृत्तीनंतर आरटीआय कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांकडून पूर्वसूचना घेतल्याशिवाय संस्थेच्या डोमेन शी संबंधित कोणतीही माहिती प्रकाशित करण्यास परवानगी दिली जाणार नाही.