…या योजनेअंतर्गत फक्त 156 रुपयांत होणार कोरोनावर उपचार; तर 2 लाखांपर्यंतचा मिळणार खर्च
गेल्या एक वर्षापासून कोरोना विषाणू जगभर कहर माजवला आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्या लाटेने देशात धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोनाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र सर्वांनी पहिले आहे.
अशा परिस्थितीत लोकांमध्ये या आजाराविषयी तसेच त्याच्या उपचारांविषयी बरेच भय आहे. बर्याचदा लोक या गोष्टीबद्दल तणावात असतात की जर त्यांना कोरोनाचा देखील फटका बसला तर त्यांचा ईलाज कसा होईल. मात्र आता आपल्याला टेंशन घेण्याची गरज नाही, देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोनाच्या खर्चासाठी एक स्किम आणली आहे, ज्याचा केवळ 156 रुपयांत फायदा घेता येऊ शकतो.
कोण आणि कसे घेऊ शकते पॉलिसी?
ही पॉलिसी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक घेऊ शकतात. यासाठी आपल्याला प्रथम कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही. आपण ही पॉलिसी ऑनलाइनद्वारे खरेदी करू शकता, ज्यामध्ये आपल्याला कव्हर पैसे आणि वेळ निवडावा लागेल. आपले प्रीमियम फक्त त्या आधारावर निर्धारित केले जाते.
SBI कोरोना रक्षक पॉलिसी विषयी थोडक्यात :
▪️ SBI ची कोरोना रक्षक पॉलिसी एक आरोग्य विमा संरक्षण योजना आहे.
▪️ भारतीय स्टेट बँकेची ही कोविड पॉलिसी कोणत्याही मेडिकल टेस्टशिवाय जारी केली जाते.
▪️ येथे 100 टक्के कव्हर दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
▪️ कोरोना रक्षक पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्ष आहे.
▪️ कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये कमीत कमी प्रीमियम 156 रुपये आणि अधिकाधिक 2230 रुपये इतका आहे.
▪️ या पॉलिसीमध्ये 105 दिवस, 195 दिवस आणि 285 दिवसांचा अवधी आहे.
▪️ स्टेट बँकेच्या या पॉलिसीमध्ये कमीत कमी 50 हजार आणि जास्तीत जास्त 2 लाख 50 हजारांचा कव्हर मिळतो.
▪️ या पॉलिसीच्या अधिक माहितीसाठी 022-27599908 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता.
▪️ तसंच https://www.sbilife.co.in/en/individual-life-insurance/online-plans या अधिकृत लिंकवरुनही अधिक माहिती घेता येईल.