पैसे काढण्यासाठी आपण साहजिकच एटीएम चा वापर करतो. अनेक वेळा आपल्याला फाटक्या नोटा मिळाल्याचा अनुभव आला असेल. या फाटक्या नोटा बदलण्यासाठी एक प्रक्रिया आहे. अगदी सहज कोणत्याही प्रकारे अडचणींचा सामना न करता आपण बदलून घेऊ शकतो…
* बँकेत जाऊन एक फॉर्म घ्या, तुम्ही एटीएम मधून नोटा फाटक्या आल्या तर कोणता फॉर्म असतो याची माहिती बँकेतून मिळवू शकतो.
* या फॉर्मवर तुम्ही कधी एटीएम मधून नोटा काढल्या, किती रुपये काढले, त्याचा सिरीयल नंबर, आणि इतर डिटेल्स भरावयाचे असतात.
* या फॉर्मला सबमिट केल्यानंतर तुम्हाला नोटा बदलून मिळतात.
* बँक अधिकारी देखील तुमच्याकडून अर्ज घेऊन काहीच वेळात नोटा बदलून देऊ शकतात. तुमची ट्रॅनजेक्शन स्लिप त्या अर्जासोबत जोडून तुम्हाला द्यावी लागेल.
* आरबीआयने 2017 एक्स्चेंज करन्सी नियमानुसार तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
* या प्रक्रियेतून जर नोटा बदलून मिळाल्या नाहीत, तरी घाबरायचे कारण नाही.
* तुम्ही ज्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले आहेत त्या बँकेत तुम्ही तोंडी, लेखी तक्रार करून नोटा बदलून घेऊ शकता.
* सहसा या मार्गाने काम होते मात्र, जर झाले नाही तर तुम्ही इतरही मार्गाने तुमचे पैसे मिळवू शकता.
* जी बँक नोटा बदलून देत नाही तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर त्या बँकेला 10 हजारांचा दंड होऊ शकतो.
पण आता बॅंकानी समजा नकार दिला तर काय ? असा प्रश्न येत असेल तर पुढे वाचा… :- बँकेमधून नोटा बदलण्यासाठी प्रक्रिया खूप सोपी आहे. जर एखादी बँक तुम्हाला यासाठी प्रतीक्षा करायला लावत असेल किंवा नोट बदलण्यास नकार देत असेल तर आपण पोलिसांत तक्रार करू शकता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार असे करणार्या बँकांना दहा हजार रुपये दंड आकारला जाईल.