प्रत्येकाकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असते. मात्र पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर, तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आयकर विभाग आणि सरकार याबाबत नेहमीच सूचना देत आले आहे. आता 30 जून पर्यंत पॅन कार्ड, आधार कार्डला लिंक झाले नाही तर तुम्हाला 10 हजारांचा फटका बसू शकतो. काय होऊ शकते नुकसान, जाणून घ्या!
1. पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल तर ते सर्वप्रथम लिंक करून घ्या अन्यथा 1 जुलै पासून तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते.
2. पॅन कार्ड इन ऍक्टिव्ह झाल्यावर याचा सर्वांत मोठा परिणाम तुमच्या केवायसीवर होईल. अनेक ठिकाणी आपला ग्राहक कोण आहे हे केवायसीच्या मार्फत तपासले जाते.
3. एवढेच नाही तर खात्यात 10 हजारांहून अधिक व्याजाची रक्कम जमा होत असेल तर 10% टीडीएस भरावा लागतो, मात्र असे पॅन कार्ड लिंक झाले नाही तर 20% रक्कम कट होईल.
4. 50 हजारांहून अधिक रक्कम बँकेत जमा करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे असते. मात्र, 1 जुलै नंतर जर पॅन-आधार लिंक झाले नाही तर पॅन नंबर चुकीचा गृहीत धरला जाऊन कायद्यानुसार 10 हजारांचा दंड आकारला जाऊ शकतो.