आज 21 जून यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा दिवस, जाणून घ्या यामागील कारण आणि रंजक माहिती
आज सोमवार 21जून महिन्यातील 3रा सोमवार. आजचा 21 जून हा दिवस भारतासह जगभरात ‘जागतिक योगदिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र आजच्या दिवसाचे आणखीन एक मोठे महत्व आहे ते म्हणजे आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो. आता असे कसे असू शकते, याचे नेमके कारण काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडणे सहाजिक आहे.
जाणून घेऊया आजच्या दिवसामागील नेमके कारण काय व पाहूया याचा रंजक इतिहास, यासाठी पुढील लेख वाचणे गरजचे आहे….
21 जून हा 2021 वर्षातला सर्वात मोठा दिवस म्ह्णून पहिले जाते. याचा दिवसाला इंग्लिशमध्ये Summer Solstice (समर सोल्स्टिस) असे देखील म्हटलं जातं. पण असे नेमकं का घडतं? ते जाणून घेऊया..
समर सॉलस्टाईस ही एक खगोलीय घटना म्हणून ओळखली जाते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. 21 जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे यादिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. जगातल्या अनेक देशांमध्ये या दिवशी दिवस 12 तासांपेक्षाही मोठा असतो.
जाणून घेऊया या दिवसाचा रंजक इतिहास :
आजच्या दिवसामागील प्रमुख कारण म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा हा मोठा असतो. आज साधारणपणे: पूर्ण दिवसातील 24 तासांपैकी 13 तासांहून अधिक काळ हा दिवस असतो. म्हणूनच आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. आज 13 तास 13 मिनिट कालावधी हा दिवसाचा असतो तर 10 तास 47 मिनिटांची रात्र असते. आजपासून उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते.
21 जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश असणार याची गणितं सर्वत्र वेगळी असतात. काही देशात 13 तासांहूनही अधिक काळ आज सूर्यप्रकाश असतो. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची (थंडीची) सुरुवात होते. तर काही देशांत उन्हाळा देखील सुरु होतो.
दरम्यान, आजचा दिवस हा काही देशांत एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. पृथ्वी हे आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी प्रति तास वेगाने सुमारे 89 कोटी 40 लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील 21 जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस 22 डिसेंबर म्हणून मानला जातो या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते.