भारत देश कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाययोजना करण्यात येत आहे.
याच दरम्यान कोरोना व्हायरसच्या भीतीने गेल्या वर्षभरापासून अनेक मोठमोठ्या नामांकित कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर अजूनहि काही मोठ्या कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत असून आता अनेकांसाठी वर्क फ्रॉम होम करणे नॉर्मल झाले आहे. वर्क फ्रॉम होम मुळे कंपन्यांना आता मोठा फायदा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी Google, Apple, Microsoft, Facebook, Twitter या नामांकित कंपनीनं सर्वात आधी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, मागली एकवर्षाचे वर्क फ्रॉम होम गुगलसाठी अत्यंत फायद्याचं ठरलं आहे. गुगलने वर्क फ्रॉम होममुळे तब्बल 1 बिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास 7400 कोटी रुपये वाचवले आहेत. गुगलचे कर्मचारी गेल्या वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम या पद्धतीने कामे करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत गूगल कंपनीने प्रमोशन आणि इंटरनटेमेंटचा देखील खर्च कमी केला. यामुळे कंपनीला तब्बल 268 मिलियन डॉलर म्हणजेच 1980 कोटी रुपये वाचवता आले आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, फक्त कोरोनामुळे हे शक्य झाले आहे. अश्या पद्धतीने दरवर्षी जर खर्चाचा एकूण विचार केला तर 1 बिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 7 हजार 400 कोटी रुपये अधिक कंपनी खर्च करीत असते. वर्षभरात कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काहीच करावे लागले नसल्याने हा संपूर्ण खर्च वाचला आहे. कोरोना महामारीच्या भीतीमुळे सर्वच जण गेले कित्येक महिने घरी आहेत. याच महामारीमुळे प्रत्येक्ष कामांमध्ये इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करण्यात आला आहे. याचा थोडाफार परिणाम देखील गूगल ला झाला आहे. यामुळे नक्कीच गुगलचा रेवेन्यू हा जवळपास 34 टक्के वाचला आहे.