देशभरात कोरोना महामारीचा हाहाकार सर्वत्र पाहायला मिळत आहे. यावेळी अनेक राज्यात लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन यासारखे अनेक महत्वपूर्ण निर्बंध लागू करण्यात आले आहे. कदाचित यामुळे देखील सर्वांना घरात राहा, असे आवाहन अनेक बँकांकडून देखील करण्यात आले आहे.
यंदाच्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसर्या महिन्यात ‘मे’ मध्ये खासगी आणि सार्वजनिक बँका एकूण 9 दिवस बंद राहणार आहेत. बँकांच्या विविध सुट्यांमुळे 5 दिवस बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वेबसाइटनुसार मे 2021 मध्ये बँक महाराष्ट्र दिन, रमजान, बुद्ध पौर्णिमा अशा विविध उत्सवांमुळे बंद असणार आहेत.
तर देशामध्ये वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे बँकांमध्ये काम करण्याची पद्धत ही बदलेली आहे. कोरोना झोनमध्ये असलेल्या बँकांच्या कर्मचार्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी सुविधा मर्यादित केल्या आहेत. यासह अनेक राज्यांतील बँकांचे कामकाजाचे तास कमी करण्यात आले आहेत. दरम्यान, यंदाच्या वर्षी मे महिन्यात कोणत्या दिवशी बँक बंद राहतील, ते पाहूया…
या महिन्यातील बँकेच्या सुट्टीची यादी
1 मे – शनिवार : महाराष्ट्र दिन / कामगार दिन
2 मे – रविवार : आठवड्याची सुट्टी
7 मे – शुक्रवार : जमात-उल-विदा (जम्मू आणि श्रीनगर)
8 मे – दुसरा शनिवार : आठवड्याची सुट्टी
9 मे – रविवार : आठवड्याची सुट्टी
13 मे – गुरुवार : ईद (ईदच्या उत्सवामुळे श्रीनगर, जम्मू, नागपूर आणि कानपूरमधील बँका बंद राहतील.)
14 मे – शुक्रवार : परशुराम जयंती / ईद / अक्षय तृतीया (जम्मू, मुंबई, नागपूर येथे या दिवशी बँका खुल्या असतील.)
16 मे – रविवार : आठवड्याची सुट्टी
22 मे – चौथा शनिवार : साप्ताहिक सुट्टी
23 मे – रविवार : आठवड्याची सुट्टी
26 मे – गुरुवार : बुद्ध पूर्णिमा
30 मे – रविवार : आठवड्याची सुट्टी