1 मेपासून 18 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोना लस मिळणार; उद्यापासून होणार नोंदणी प्रक्रिया सुरु….
मोदी सरकारने नुकतीच मागील काही दिवसंपूर्वी 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची मोठी घोषण केली आहे. त्यानुसार पुढील काही दिवसात म्हणजेच येत्या 1 मे पासून हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी 28 एप्रिलपासून म्हणजे उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
या नोंदणीसाठी आधीप्रमाणेच कोविन अँपवर ही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करण्याची प्रक्रिया आधीप्रमाणेच असेल, असं केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून स्पष्ट कारणात आले आहे. सर्वात आधीच्या टप्प्यांमध्ये केंद्र सरकारने सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच सुरुवातीला 65 वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केलं होतं. आता पुढील काही दिवसंपासून म्हणजेच 1 मेपासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.
कोरोना लस घ्यायची असल्यास नोंदणी कशी करणार?
▪️ कोविन पोर्टलवर https://selfregistration.cowin.gov.in/ आपला मोबाईल नंबर टाकून GET OTP (ओटीपी मिळवा) वर क्लिक करा व पुढील तपशील भरून नोंदणी करा.
▪️ येथे आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर भरा
▪️ तुम्हाला ओटीपी मोबाईलवर मिळेल, नंबर टाकून रेजिस्ट्रेशन करा
▪️ रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लसीकरणासाठी दिवस आणि वेळ ठरवू शकता
▪️ हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही लस घेऊ शकता.
▪️ यावेळी तुम्हाली रेफ्रन्स आयडी मिळेल, याच्या माध्यमातून तुम्हाला लस सर्टिफिकेट मिळू शकते.
रेजिस्ट्रेशनच्यावेळी तुमच्याजवळ खालीलपैकी एक डॉक्युमेंट असणे आवश्यक :
▪️ आधारकार्ड
▪️ पॅनकार्ड
▪️ मतदानकार्ड
▪️ ड्रायव्हिंग लायसेन्स
▪️ हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड
▪️ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीम रोजगार कार्ड
▪️ पासपोर्ट
▪️ बँक/पोस्ट ऑफिसकडून जारी करण्यात आलेले पासबुक
▪️ पेन्शन डॉक्युमेंट
▪️ सर्विस आयडेन्टी कार्ड (केंद्रीय/राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेले)
दरम्यान, आपण आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रास भेट देऊन देखील लसीकरणाची नोंदणी करू शकता. लस डोस घेत असलेल्या लोकांना प्रमाणपत्र दिले जाते. आपण हे पोर्टलवर तयार केलेल्या आपल्या खात्यातून देखील डाऊनलोड करू शकता.