हल्ली प्रत्येकाचा सोशल मिडिया वावर वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाला एकाच वेळी अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर असणे हे गरजेचे झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कदाचित हा वावर पाहता हॅकिंगसारख्या गैरप्रकारांनाही खुले रान मिळाले आहे. फेसबुकचे अकाउंट, जीमेल किंवा ट्विटरचे अकाउंट हॅक होणे ही अनेकांना भेडसावणारी मोठी समस्या आहे. तर अनेकदा त्याचा होणारा गैरवापर देखील महागात पडू शकतो. याचा पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला हॅकिंगपासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना सांगणार आहे….
गुगलच्या सर्वच सेवा हि एक काळाची गरज झाले आहे. आजकालच्या जमान्यात कदाचित ईमेल सेवा जगभरात सर्वात जास्त वापरणारी सेवा आहे. सध्या जगात जवळपास 100 कोटीहुन अधिक लोक जीमेलचा वापर सातत्याने करतात. म्हणूनच हॅकर्सचाही या अकाऊंटसवर डोळा असतो तर अश्यावेळी अकाउंट हॅक होण्याचा धोका नाकारता येत नाही. तर अशावेळी आपण आपले अकाऊंट हॅक झाल्यावर आपण नेमके काय करावे व करू नये याबाबत तुम्हाला संपूर्ण माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही हॅक झालेले अकाऊंट रिकव्हर करण्यासाठी या सोप्या पद्धतीचा वापर करू शकतात.
Gmail Account हॅक झाल्यास कसं कराल रिकव्हर :
▪️ तुम्ही सर्वप्रथम जीमेल चालू करून, त्यानतंर अकाऊंट रिकव्हरी पेजवर जा
▪️ तुम्हाला तुमच्या अकाउंटचा पासवर्ड लक्षात नसेल तर तिथे विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे द्या.
▪️ यानंतर तेथे चालू करण्यासाठी रिकव्हरी ई-मेल किंवा मोबाईल क्रमांकाचा वापर करा.
▪️ जीमेल तुमचा मालकी हक्काची सर्वती तपासणी करण्यासाठी त्या रिकव्हरी मेल आयडीवर किंवा रिकव्हरी मोबाइलवर एक रिकव्हरी कोड पाठवेल.
▪️ रिकव्हरी कोड मिळाल्यानंतर जीमेलमध्ये विचारल्या त्याठिकाणी तो कोड टाका. त्यानंतर त्वरित गुगल तुम्हाला पासवर्ड बदलण्यास सांगेल.
▪️ साइनइन केल्यानंतर जीमेल तुम्हाला पुन्हा एकदा सिक्युरीटी चेकींगसाठी विचारणा करेल. तेव्हा सिक्युरीटी चेक करा आणि पुन्हा एकदा सिक्युरीटीची माहिती बदला.
असे ठेवा जीमेल अकाऊंट सुरक्षित
▪️ सिक्युरीटी चेकींगसाठी देण्यात आलेले नियम योग्यरितीने वाचा आणि त्यांचे पालन करा. यामध्ये तुम्हाला तुम्ही वापरत असलेली अॅप्लिकेशन्स, डिव्हाईस, अकाऊंटची माहिती सुरक्षित आहे की नाही ते समजते.
▪️ तुम्ही तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड कधीच बदलला नसेल तर तो ठराविक काळाने बदलत राहा.
▪️ ज्या अॅप्लिकेशन आणि साईटससाठी तुम्ही जीमेलचाच पासवर्ड वापरता तोही पासवर्ड बदला.
▪️ तुम्ही जीमेल अकाऊंटच्या रिकव्हरीसाठी दिलेला दुसरा मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक योग्य असेल असे बघा.
तुमचं जीमेल अकाउंट कुठे कुठे लॉगइन आहे :
▪️ तुमचं जीमेल अकाउंट इतर ठिकाणी कोणत्या अकाउंटशी कनेक्ट आहे, कुठे लॉगइन आहे हे सहजपणे समजू शकतं.
▪️ सर्वात आधी Settings मध्ये जा. Settings मध्ये जीमेल आयडी दिसेल, त्यावर टॅप करा.
▪️ आता इथे ‘Manage your google account’ सिलेक्ट करावं लागेल.
▪️ हे सिलेक्ट केल्यानंतर पेजवर अनेक ऑप्शन दिसतील. ज्यात ‘Security’ सिलेक्ट करावं लागेल.
▪️ त्यानंतर स्क्रोल करुन ‘Your Devices’ हा पर्याय येईल.
▪️ या पर्यायात सर्व अकाउंट्स किंवा लॉगइन दिसतील, ज्यात तुम्ही तुमचं Gmail लॉगइन केलं आहे.