आता तुम्ही घरबसल्या ओळखू शकतात तुम्हाला कोरोना आहे कि नाही; जाणून घ्या भन्नाट अँपविषयी
जगभरात कोरोना महामारीने उग्र अवतार धारण केला आहे. कोरोना विषाणूने आता सर्वत्र थैमान घालत आहे. भारतामध्ये दुसरी लाट अगदी मोठ्या प्रमाणात लोकांना बाधित करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सदृश्य स्थिती निर्माण झाले आहे तर काही राज्यांनी लॉकडाऊन देखील लावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्याच मनात आपल्याला कोरोना झाला आहे की नाही याबद्दल मोठी शंका आपापसात व्यक्त केली आहे…
परंतु आता चिंता नको!!! आता तुम्ही तुमच्या घरी निवांत बसून तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही याची माहिती मिळू शकता. ही बाब तुम्हाला ऐकयला खोटी वाटत असं परंतु हि बाब खरी आहे. आता कोरोना चाचणीसाठी असे एक ॲप उपलब्ध आहे. ज्याच्या मदतीने तुमच्या आवाजावरून तुम्ही कोरोनाग्रस्त आहात की नाही याची चाचणी करू शकता.
नेमके हे प्रकरण काय ?
अनेक जण गेम खेळण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फोन करण्यासाठी सध्या स्मार्टफोनचा अधिक वापर करत आहे. मात्र आता स्मार्टफोनच्या मदतीने कोरोनाची देखील माहिती मिळणार आहे. स्मार्टफोनमार्फत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याची आता माहिती मिळणार आहे. लक्षणं नसलेल्या व्यक्तींची देखील यामुळे माहिती मिळणार आहे.
एक कंपनीने सर्वांसाठी एक अँप उपलब्ध केले आहे. व्होकॅलिस चेक (VocalisCheck) असं त्या ॲपचे नाव आहे. ॲपल आयफोन (iphone) आणि अँड्रॉइड अशा दोन्ही स्मार्टफोनसाठी हे ॲप आहे. व्होकॅलिसहेल्थ या इस्रायली तंत्रज्ञान कंपनीने हे ॲप विकसित केलं आहे. हे ॲप ओपन करून त्यावर 50 ते 70 हे आकडे मोठ्याने म्हणायचे, त्याचा ऑडिओ युझरच्या फोनवर रेकॉर्ड होतो. ऑडिओ मॅपस्पेक्ट्रोग्राममध्ये रूपांतरित होतो. तो हीट इमेजप्रमाणे दिसतो.
कोविड रुग्णांच्या हीट इमेजेसशी स्पेक्ट्रोग्राम जोडून पाहिला जातो. त्याआधारे ॲप आपला निष्कर्ष दर्शवतं. युझरच्या आवाजातून प्राप्त झालेली माहिती उपलब्ध नमुन्यांशी जोडून पाहण्यासाठी यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे.
या ॲपची चाचणी भारतातही घेतली जात आहे. याच्या अचूकतेचं प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये व्होकॅलिस हेल्थ कंपनीने बृहन्मुंबई महापालिकेच्या सहकार्याने नेस्को कोविड-19 केंद्रावर ‘क्लिनिकलस्टडी’चं आयोजन केलं होतं. त्यात 2 हजार जण सहभागी झाले होते.
हे अँप इंग्लिश,हिंदी,मराठी आणि गुजराती अशा भाषांत त्यांच्या आवाजांचे नमुने रेकॉर्ड करण्यात आले. त्यातून निघालेल्या निष्कर्षांच्या अचूकतेचं प्रमाण 81.2 टक्के होतं.
दरम्यान, कोरोना चाचणी करण्यासाठी काहीठिकाणी rt-pcr बंधनकारक करण्यात आले आहे. ही चाचणी महागडी असून या ॲपचा वापर व्यवस्थितरित्या करण्यात आला तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती म्हणून याकडे बघता येईल, आणि कोरोनाच्या कठीण लढाईमध्ये याचा भरपूर प्रमाणात जगभर उपयोग होईल.