नोकरीची मोठी संधी..!! आयटी क्षेत्रातील ‘ही’ नामांकित कंपनी देणार 28 हजार फ्रेशर्सना जॉब्स.
कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेकांना आपल्या नोकऱ्यांना गमवावी लागले आहे. अशातच काही कंपन्यांना मात्र फ्रेशर्सना नोकरीच्या संधी देत त्यांच्या जीवनाला नवी ऊर्जा मिळवून देत आहे. तर कोरोना संकटामुळे जॉबच्या शोधात असलेले फ्रेशर्सदेखील मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. परंतु आता चिंता सोडा, आयटी क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या फ्रेशर्ससाठी एक महत्तवपूर्ण बातमी.
आयटी क्षेत्रातील प्रमुख व नामांकित कंपनी कॉग्निझंटने (Cognizant) यंदाच्या वर्षी (2021 साली) 28 हजार (28000 thousand) फ्रेशर्सची भरती करण्याची मोठी घोषणा केली आहे. मागील वर्षी म्हणजे 2020 मध्ये देखील या कंपनीने 17 हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली होती. यंदाच्या वर्षी या मध्ये 18 टक्के वाढ करण्यात आली आहे.
कॉग्निझंट या आयटी कंपनीत एकूण कर्मचाऱ्यांची संख्या हि 02 लाख 96 हजार 500 एवढी आहे. त्यापैकी केवळ दोन लाखाहून अधिक कर्मचारी हे भारतात कार्यरत आहेत. तर या घोषणे वेळी कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की….
कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रीज (Brian Humphries) म्हणाले :
“सध्या जगभरात कोरोना महामारीने आतापर्यंत अनेकजण चिंतेत आहेत. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर कॉग्निझंट कंपनीने जॉब संदर्भात हे पाऊल उचलले असून आम्ही कर्मचाऱ्यांच्या पगाराचे योग्य ती व्यवस्थापन करण्याचे काम करीत आहोत.”
या पुढे ते म्हणाले कि, गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात कंपनीतील कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, ही जागा आम्हाला भरून काढायची आहे. भारतात नोटीस पीरियड हा दोन महिन्यांचा होता. तर त्यामुळे यंदा भरतीच्या जागांमध्ये वाढ करण्यात अली असून, आम्ही अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत हा निर्णय घेतला आहे.
तर याशिवाय कंपनीच्या आवाहलात ते म्हणाले कि..:
कंपनी यंदा मल्टी-पार्ट योजना राबवित असून, ज्यामध्ये अनेकांना करियरच्या मोठी संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तर प्रशिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपल्या करिअरचा आणखी मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याची संधी मिळेल. तसेच कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्रैमासिक पगारवाढ पद्धतीत बदल करण्यात येणार आहे आणि महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि पदवाढ देण्याबाबतचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे नक्कीच फ्रेशर्ससाठी ही एक चांगली संधी आहे.
🎯 हि माहिती नक्की शेअर करा..!