देशभरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत तर दुसरीकडे देशात सरसकट 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मोहीम अत्यतं जोरानी सुरू झाले आहे. या लसीकरणासाठी प्रत्येकानी कोविन पोर्टलवर(Cowin Portal) नोंदणी हे देखील आवश्यक आहे. कोविन पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे. वास्तविक ज्या लोकांनी आतापर्यंत लसीकरणासाठी डॉक्टरणीची ॲपाईंटमेंट घेतली होती, परंतु काही कारणास्तव तो व्यक्ती लसीसाठी जाऊ शकले नाहीत, त्यांनाही लस दिल्याचा काही संदेश येऊ लागला. त्यांच्या तक्रारीनंतर आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविन पोर्टलमध्ये मोठे बदल केला आहे.
नेमके काय आहे नवीन बदल?
जर आताच्या या नवीन बदलाअंतर्गत लस नोंदणीनंतर जर तुम्ही अपॉईंटमेंट बुक कराल तर आपल्या मोबाइल नंबरवर 4 अंकी ओटीपी(OTP) येईल. आपल्याला आपल्या अपॉईंटमेंट वेळी लसीकरण केंद्रात हा ओटीपी दर्शविण्याची आवश्यकता असेल. हे OTP अपॉइंटमेंट बुक केली होती कि नाही याची प्रथम पडताळणी करेल. याशिवाय, यापुढे लसीकरणाच्या डेटामध्ये कोणतीही अडचण होणार नाही.
कोविन पोर्टलवर (Cowin Portal) बदल करण्याचे कारण काय?
खरं तर, कोविन पोर्टल विषयी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे अनेक तक्रारी येत होत्या. तक्रारी म्हणजे कि ज्या व्यक्तीने लसीकरणासाठी आतापर्यंत अपॉईंटमेंट बुक केली आहे पण लसीसाठी काही अडचणी मुळे जाऊ शकत नाही अशा लोकांनाही प्रथम लस दिल्याचे संदेश मिळत आहे तर काहीना तर लसीचे प्रमाणपत्रही देण्यात आले. मंत्रालयाचे आता म्हणणे आहे की, काही आरोग्य कर्मचार्यांकडून चुकून कोविन पोर्टलवर (Cowin Portal) अशा लोकांना लस दिल्याची पुष्टी केली गेली.
पोर्टलवर इतर काही गोष्टी बदल्या आहेत का?
होय बदल झाला, ओटीपी व्यतिरिक्त देखील कोविन पोर्टलचा डॅशबोर्डही (DashBoard) बदलला आहे. आता जेव्हा आपण अपॉइंटमेंटसाठी फॉर्म भरतात त्यावेळी पिनकोड किंवा जिल्ह्यासाठी प्रवेश भरून, त्यानंतर आपल्यासमोर 6 नवनवीन पर्याय उघडतील. या सर्व पर्यायांद्वारे आपण आपले वयोगट (18+किंवा 45+) कोणत्या प्रकारची लस (कोव्हीशील्ड किंवा कोव्हॅक्सिन), विनामूल्य किंवा सशुल्क लस निवडण्यास तुम्हाला असे विविध पर्याय निवडाल.
याशिवाय आता या सुविधेद्वारे आपल्याला आधीपासून सर्व माहिती मिळेल. वास्तविक, पाहता बर्याच लोकांची अशी हि मागणी होती की आम्हाला कोणती लस हवी आहे ते निवडण्याचा अधिकार आम्हा स्वतःला देण्यात यावा. त्यामुळे हा बदल करण्यात आला असून, आता यामध्ये आपल्याला कोणती लसी कुठे आणि कोणाला घ्यायची आहे याबद्दल सर्व ती माहिती एकच ठिकाणी मिळेल. तेव्हा त्यानुसार आता आपण स्वत: साठी टाईमिंग देखील बुक करू शकतो.
बदल झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया कशी असेल?
▪️ प्रथम कोविन पोर्टलला भेट देण्यासाठी कॉम्पुटर किंवा मोबाईलच्या साह्याने सर्वप्रथम www.cowin.gov.in/home या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
▪️ यानंतर आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला वरील बाजूस Register / Sign In Yourself वर क्लिक करा.
▪️ आपला मोबाईल नंबर टाकून करून Get OTP या ठिकाणी क्लिक करा.
▪️ मोबाईलमध्ये OTPआलेला तो OTP त्या ठिकाणी टाका व व्हेरिफाय करा.
▪️ यानंतर तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करा. येथे आपल्याला आपला फोटो आयडी प्रूफ, नाव, लिंग आणि जन्म वर्ष भरावे लागेल. सर्वांनी लक्षात ठेवा की आपण जी काही माहिती भरत आहात ती फोटो आयडी प्रूफनुसार भरा. जेणेकरून लसीकरणावेळी आपल्याला हा आयडी पुरावा आपल्याबरोबर घेऊन जावे लागलं.
▪️ नोंदणी प्रक्रिया येथे संपली आहे. आता आपण यानंतर आपले अपॉइंटमेंट शेड्यूल करू शकाल.
▪️ अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी नोंदणीकृत व्यक्तीच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या आपल्या नावाच्या पुढे शेड्यूलवर क्लिक करा.
▪️ येथे आपण पिनकोड किंवा जिल्ह्यावर आधारित आपल्या जवळचे लसीकरण केंद्र सर्च करू शकतात.
▪️ येथे आपण एज ग्रुप, कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन विनामूल्य किंवा सशुल्क लस निवडण्यास सक्षम असाल.
▪️ आपल्या सोयीनुसार अपॉईंटमेंट बुक करा. अपॉईंटमेंट बुक केल्यावर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज मिळेल. ज्यात 4 अंकी कोड देखील असेल. हा कोड लसीकरणावेळी संबंधित आरोग्य कर्मचार्यास दाखवावा लागेल.