लॉकडाऊनमुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली, अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली. अशा वर्गातील ग्राहकांना Vi ही मोबाईल नेटवर्क कंपनी मोफत रिचार्ज देणार आहे.
75 रुपयांचा हा रिचार्ज 15 दिवसांसाठी वैध असणार आहे. याला अनलॉक बेनिफिट 2.0 असे नाव देण्यात आले आहे. यासोबत Vi ते Vi कॉल्स 50 मिनिटे मोफत असणार आहेत आणि 50 एमबी डेटा देखील मिळणार आहे.
असा मिळेल मोफत रिचार्ज
तुम्ही या मोफत रिचार्जसाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी वोडाफोन आयडिया ग्राहकांना USSD कोड 44475# डायल करावा लागेल.
तसेच 121153 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून देखील तुम्ही तुमची पात्रता बघू शकता. त्याचबरोबर कंपनी आपल्या ग्राहकांना मेसेजच्या माध्यमातून या ऑफरची माहिती देत आहे.
तुम्ही तुमच्या जवळच्या वोडाफोन आयडिया स्टोरवर जाऊन देखील या ऑफरची संपूर्ण माहिती घेऊ शकता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी याचा कंपनीने कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी 49 आणि 79 रुपयांचे दोन छोटे प्लॅन सादर केले होते. यातील 49 रुपयांचा प्लॅन मोफत देण्यात आला होता तर 79 रुपयांच्या प्लॅनमधील फायदे दुप्पट करण्यात आले होते.