आजकाल शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्ध व्यक्तिपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसतो. ऑनलाईन एज्युकेशन मुळे लहान-मोठे प्रत्येक जण आज मोबाईल वापरतात.
आपल्या फोनमध्ये अनेकदा चुकून एखादा व्हायरस आला तर फोन हँग होणे, किंवा कित्येकदा बँक अकाउंट रिकामे होणे इथपर्यंत गोष्टी घडू शकतात.
‘जोकर मालवेअर’ नावाचा एक व्हायरस तुमच्या फोन मध्ये शिरून तुमचे अकाउंट रिकामे करू शकतो. कोणत्या ॲप्स मध्ये हा व्हायरस शिरतो? तर असे ॲप्स ज्यात तुमचे कॉन्टॅक्टस आणि ओटीपी, बँक डिटेल्स येतात, त्या ॲप्समध्ये अशी अफरातफरी होऊ शकते.
कोणते आहे हे धोकादायक अँप्स
– Auxiliary Message
– Fast Magic SMS
– Free CamScanner
– Super Message
– Element Scanner
– Go Messages
– Travel Wallpapers
– Super SMS
अँप्स कसे कराल डिलिट :
▪️ Google Play Storeवर जा. त्यानंतर स्मार्टफोनमध्ये असलेले मालवेअरवालं अॅप सर्च करा.
▪️ त्यानंतर अॅप पेजवर Uninstall करा.
▪️ असे केल्यानंतर तुमचे धोकादायक App फोमधून डिलीट होईल.
▪️ तसेच होम स्क्रिनवर जाऊनही अॅपवर लाँग प्रेस करुन, ‘x’ आयकॉन मिळतो, तिथूनही डिलीट करू शकतात.