अँपमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना लसीकरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली असून, ज्यामध्ये कोरोना लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया आणि इतरही काही गोष्टी सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आल्या आहेत…
आरोग्य मंत्रालयाच्या सांगितल्याप्रमाणे…:
कोरोना लसीकरणासाठी http://cowin.gov.in हे पोर्टल किती महत्त्वपूर्ण आहे, याबाबतही आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली. तर प्रत्येक रुग्णाने ‘कोरोना लसीकरणाची तारीख घेण्यासाठी नोंदणी ही #CoWIN पोर्टलच्याच माध्यमातून करावी.
CoWIN App हे सर्वसमान्य लाभार्थींसाठी उपयोग नाही. तर प्लेस्टोअरवर असणारे अँप फक्त प्रशासकीय वापरासाठीच आहे. सोमवारी कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास http://cowin.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून झाली.
45 वर्षांवरील वयोगटातील व्यक्ती, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे आणि मागील वर्षभरात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अशा जवळपास 20 कोमोर्बिड निकषांमध्ये मोडणाऱ्या व्यक्ती या लसीकरणाच्या टप्प्यासाठी पात्र आहेत.
अश्या प्रकारे करा नोंदणी :
▪️ सर्वात पहिले http://cowin.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
▪️ इथं तुमचा वैध मोबाईल क्रमांक टाईप करा. व पुढं “Get OTP (One Time Password)” या बटणावर क्लिक करा.
▪️ एक एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी देण्यात येईल.
▪️ ओटीपी तिथं दिलेल्या ठिकाणी क्लिक करुन “Verify” या बटणावर क्लिक करा.
▪️ यानंतर ओटीपीची पडताळणी झाली कि तुम्ही “registration of Vaccination” अर्थात लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या पेजवर पोहोचाल.
▪️ इथे लाभार्थींने आवश्यक ती माहिती भरावी.
▪️ सर्व माहिती दिल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर “Register” या बटणावर क्लिक करा. त्यानतंर तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा असा एक मेसेज येईल.
▪️ Account details page वर असणाऱ्या कॅलेंडर या बटणावर क्लिक करुन किंवा “Schedule Appointment” वर क्लिक करुन लसीकरणासाठीची तारीख मिळवता येईल.
▪️ इथं “Book Appointment for Vaccination page” असाही पर्याय दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या केंद्राची आणि वेळेची निवड करत लसीकरणासाठीचं हे पुढचं पाऊल टाकणं शक्य होईल.
🎯 हि माहिती नक्की शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हाट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/registerletstalk