पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट आणि मतदार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र प्रत्येकाला आपल्या आयुष्यात लागत असतात. मात्र, कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत पावली तर या सर्व कागदपत्रांचे होते काय? हे बंद करावे लागतात कि, ते आपोआप रद्द होतात नेमकी काय असते प्रक्रिया जाणून घ्या!
आधार कार्ड
आधार कार्ड अनेक महत्त्वाच्या अकाऊंट ला जोडलेले असते. अनेक कामे त्यावर अवलंबून असतात. व्यक्ती मृत पावल्यानंतर, ते बंद कसे करायचे यावर UIDIA ने काही मार्ग सांगितलेला नाही. त्याबद्दल कल्पना मिळाल्या नंतर UIDIA त्यावर मार्ग काढते.
पॅन कार्ड
पॅन कार्ड हे आपल्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असल्याने इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये जाऊन ते बंद करावे लागते. पॅन कार्ड बंद करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित बँक खाते आधी बंद करावे अन्यथा पॅन कार्ड आधी बंद झाल्यास, बँक अकाऊंट ला प्रॉब्लेम येऊ शकतो.
मतदान कार्ड
मतदान कार्ड हे आपल्याला मतदान, भारतीय नागरिकत्व अशा अनेक गोष्टींसाठी महत्वाचे असते. मतदार ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी कार्ड हे मतदान करण्यासाठी अत्यावश्यक असलेलं ओळखपत्र आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर मतदार ओळखपत्र रद्द करता येतं. मतदार नोंदणी नियम 1960 अंतर्गत मतदार ओळखपत्र मतदाराच्या मृत्यूनंतर रद्द करण्याची तरतूद आहे. कुटुंबातल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधिताचं मतदार ओळखपत्र निवडणूक कार्यालयात जाऊन सात नंबरचा फॉर्म भरून रद्द करता येतं.
पासपोर्ट
परदेश प्रवास, परदेशी वास्तव्य यासाठी पासपोर्ट, व्हिसा महत्वाचा असतो. पासपोर्टचे मृत्यूनंतर काय होते हे माहीत नसल्यास एक गोष्ट लक्षात असू द्यात, ती अशी की पासपोर्ट एक वैधता घेऊन येतो. त्याची तारिख संपली की, बरोबर तो नूतनीकरणा अभावी संपुष्टात येतो.