देशभरात कोरोनाचा (Corona) उद्रेक सुरू असताना, या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाउन (Lockdown) ची मोठी घोषणा करण्यात अली आहे. लॉकडाउन काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय देखील काही भागात प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे जर तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करताना घ्या खबरदारी या बातमी वर विशेष लक्ष देणं गरजेचे.
सरकारी गाईडलाईन्सनुसार या गोष्टी मिळणे कठीण :
ई-कॉमर्स (E-Commerce) कंपन्याच्या म्हण्यानुसार, प्रामुख्याने लॉकडाउन असणाऱ्या सर्व राज्यांमध्ये त्यांना लॅपटॉप-मोबाईल फोनसह इतर काही गॅजेट्सची खरेदी करण्याची परवानगी तुरताच नाही, त्यामुळे पुढील काही दिवस ग्राहकांना ऑर्डर येण्यास कठीण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक लहान-मोठ्या राज्यांच्या लॉकडाउन गाईडलाईन्समध्ये हे स्पष्ट देखील करण्यात आलं आहे, की या कठीण काळात केवळ आणि केवळ अत्यावश्यक सामानाचीच डिलीव्हरी केली जाईल.
Amazon ने देखील आपल्या वेबसाईटवर, सरकारी नियमानुसार, आम्ही केवळ अत्यावश्यक सामानाचीच डिलीव्हरी देणार आहोत असे सांगतले आहे.
रिलायन्स (Reliance) डिजीटल व Flipkart Mobile App वरही, सरकारी निर्बंधांमुळे काही पिन कोडची डिलीव्हरी होल्डवर असून सरकारच्या आदेशानंतरच इतर डिलीव्हरी स्वीकारल्या जातील, असा मोठा निर्णय घेतला आहे.
तर याआधी देखील विविध मोठा उद्योग संघटना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा सातत्याने मांडला जात आहेत. पण तूर्तच लॉकडाउन (Lockdown) दरम्यान मोबाईल (Mobile), लॅपटॉप (LapTop) यासारख्या इतर काही गॅजेट्सची वस्तूंची विक्रीही विलंब न करता सुरू करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणत्याहि प्रकारची वस्तूंचा आवश्यक आणि अनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करायचा, ते सर्वांतरीं राज्यांवर अवलंबून असेल. तर नंतर काही वेळेने मोबाईल फोन आवश्यक त्या वस्तूंच्या यादीत समाविष्ट केल्या जाऊ शकतात. परंतु सध्या किराणा सामान, हेल्थ प्रोडक्ट आणि पर्सनल केअर इत्यादी वस्तूंची ऑनलाईन डिलीव्हरी होत आहे.