पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर भिडले गगनाला; राज्यांत पेट्रोल शंभरीपार
तेल कंपन्यांनी आठवडय़ात सलग पाचव्यांदा इंधन दरात वाढ केल्याने सोमवारी पेट्रोल, डिझेल (Petrol-Diesel Price) दराने नवा उच्चांक नोंदवला. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलने लिटरमागे शंभरी पार केली.
सोमवारी पेट्रोल दरात 26 पैसे, तर डिझेल दरात 33 पैशांनी वाढ करण्यात आली. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच 4 मेपासून सरकारी तेल कंपन्यांनी केलेली ही पाचवी दरवाढ आहे.
या दरवाढीमुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला. दिल्लीत पेट्रोल दर 91 रुपये 43 पैसे आहे, तर डिझेलदर 82 रुपये 6 पैसे झाला. राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.
परभणीत पेट्रोल 100 रुपये 20 पैसे
परभणीत सोमवारी पेट्रोल दर 100 रुपये 20 पैशांवर पोहोचला. मुंबईत पेट्रोल दर 97 रुपये 86 पैसे असून, डिझेल दर 89 रुपये 17 पैसे आहे. राज्याच्या अन्य भागांतही पेट्रोल लिटरमागे शंभर रुपयांच्या आसपास आहे.
असा घ्या जाणून आपल्या शहरातील ताजे भाव :
पेट्रोल-डिझेलच्या किंमती आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या https://iocl.com/ नुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत दररोज मोठमोठे बदल असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात.