केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळने म्हणजेच बोर्डाच्या बारावी परीक्षेसाठी क्वेश्चन बँक जारी करण्यात आली असून, ही परीक्षा कोरोना व्हायरस महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे लांबणीवर पडली आहे.परंतु विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रश्नपेढी महत्त्वाची असल्याने हि प्रश्नपेढी जारी केली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांनासाठी सबजेक्ट वाइज क्वेश्चन बँक अपलोड केली असून, विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन क्वेश्चन बँक चेक आणि डाऊनलोड देखील करू शकतात.
प्रश्नपेढी अशी करा डाउनलोड…:
▪️ सर्वात प्रथम सीबीएसईच्या cbseacademic.nic.in किंवा cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
▪️ त्यानतंर पुढील पानावर जाऊन होमपेज वर, ‘question bank’ टॅब वर जा आणि तेथे इयत्ता बारावी वर क्लिक करा.
▪️ तुमच्या मोबाईल स्क्रीनवर एक नवं पेज उघडेल.
▪️ तुम्हाला ज्या विषयांची आवश्यकता आहे, तो विषय पुढे निवडा.
▪️ यानंतर पीडीएफ फाइलसह एक नवं पेज उघडेल.
▪️ तेथून आपण क्वेश्चन बँक डाऊनलोड करू शकता व यानंतर आपण आपल्या परीक्षेची पूर्ण तयारी करू शकता.
दरम्यान, सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट वर जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, बोर्ड परीक्षांच्या 15 दिवस आधी बारावी बोर्डा परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देण्याचेही आवाहन बोर्डाकडून सातत्याने करण्यात आले आहे.