आता व्हॉट्सॲपवरून करा मोबाईल रिचार्ज, मिळवा लसीकरण केंद्रांचीही माहिती!
व्हॉट्सॲप हे आपल्या ग्राहकांसाठी सतत काहींना काही नवनवीन व हटके असे अपडेट घेत असतो. तर तसचे देशातील सर्व टेलिकॉम कंपन्या देखील आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन सुविधा घेऊन येत असते. यावेळी व्हॉट्सॲपवरून रिचार्ज करण्याची तसेच लसीकरण केंद्रासंबंधित माहिती मिळण्याची सुविधा रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आले आहे.
जिओने ही सुविधा आपल्या व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून सुरू केली आहे. आता जिओ कंपनीची युझर्स व्हॉट्सॲपच्या मदतीने बिल भरणा, समस्यांचे निराकरण आणि तक्रार नोंदवण्यासह चॅटबॉटवर अन्य सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहे.
असे करा मोबाईल रिचार्ज
जिओने आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेली हि सुविधा 7000770007 या क्रमांकावर उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युझरला या क्रमांकावर केवळ Hi असा मेसेज पाठवावा लागणार आहे. व्हॉट्सॲप हे चॅटबॉट अन्य मोबाईल नेटवर्कसाठी देखील लवकरच काम करत आहे. याच्या मदतीने युझर्स लस उपलब्धतेच्या माहितीसह रिचार्ज देखील करू शकणार आहेत.
कोविड-19 लशीच्या उपलब्धतेची माहिती देखील युजर्स विना वनटाईम पासवर्ड (OTP) चॅटबॉटच्या माध्यमातून घेऊ शकणार आहेत.
अशी घेऊ शकता लस उपलब्धतेची माहिती
रिलायन्स जिओची ही नवी सेवा जिओ केअर व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून युजर्सने आपला पिनकोड पोस्ट करून किंवा आपल्या परिसराचा पिनकोड टाईप केल्यानंतर लसीकरण केंद्र आणि लस उपलब्धता रिफ्रेश करून लशीबाबतची संपूर्ण माहिती घेऊ शकतात.
जिओ युझर्स आता व्हॉटसअपच्या माध्यमातून मोबाईल पोर्टेबिलिटी सर्व्हिस, जिओ सिम, जिओ फायबर इंटरनेट, जिओ मार्ट आणि आंतरराष्ट्रीय रोमिंगचा सपोर्ट देखील मिळवू शकता. जिओ व्यतिरिक्त अन्य नेटवर्कवरून किंवा रजिस्ट्रेशन न केलेल्या क्रमांकावरून चॅटबॉट एक्सेस करताना अकाऊंटशी संबधित माहिती देण्यापूर्वी युझर्सची पडताळणी देखील केली जाते.