सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या 11 एप्रिलपासून सुरू होणार असून, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने याबाबतची सविस्तर नियमावली प्रसिद्ध केली आहे त्यात रविवारीसुद्धा परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे विद्यापीठाची परीक्षा ही 15 मार्चपासूनच सुरु होणार असली तरी, मात्र एजन्सी निवडण्याची प्रक्रिया चुकल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली. त्यानुसार आता येत्या 15 एप्रिलपासून ही परीक्षा होणार आहे. विद्यापीठाच्या कंपनीतर्फे परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन केले गेलं आहे.
फक्त 70 टक्के अभ्यासक्रमावर होणार परीक्षा
प्रथम सत्र वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, एम.एड.,एम.पी.एड, बीएस्सी -बी.एड., बी.ए- बी.एड या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संबंधित अभ्यास मंडळाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.
सराव परीक्षेची संधी
तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेत व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार आहे. यापूर्वी सोडवलेली उत्तरे सेव्ह करुन खंड पडल्यास तिथून परीक्षा पुन्हा सुरु होईल. परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी उपलब्ध करुन दिली जाईल. अंदाजे, येत्या 7 एप्रिलपासून विदयार्थ्यांना सराव परीक्षा देण्यात येईल.
त्याच विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने…
ज्या विद्यालयांकडून ज्या विद्यार्थ्यांचे इन सेमिस्टर, ऑनलाईन आणि सेशनल परीक्षांचे अंतर्गत गुण 10 एप्रिलपर्यंत पात्र होतील. त्याच विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येतील.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने होणार असून यामध्ये 50 मार्कसाठी 60 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. तसंच या परीक्षेचा निकालही ऑनलाईन पद्धतीनेच लावण्यात येणार आहे.
10 वी, 12 वीच्या प्रश्नसंचामध्ये काही चुका, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी; जाणून घ्या नेमके प्रकरण काय ?