तुम्ही बेरोजगार आहात, नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. अभिनेता सोनू सूद गरजवंतांसाठी पुन्हा एकदा धावून आला आहे.
त्याने तब्बल 01 लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली आहे. टि्वटरवरून त्यानी माहिती दिली आहे. अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला होता.
त्याने केलेल्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की त्यांनी सुमारे 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलण्याची योजना आहे. यासाठी तो एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था करणार आहे असे सांगतले आहे.
काय आहे गुडवर्कर अॅप?
– गुडवर्कर अॅप हे एक नोकरी (Job) मिळवण्यासाठी मदत करणारे अॅप्लिकेशन आहे.
– देशातील प्रवासी मजुरांना नोकरी मिळवून देण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे.
– बेरोजगार असलेले आणि नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी हे अॅप आहे.
– लाखो लोकांना जॉब लिंकेज आणि करिअरसाठी मदत करणं हा गुडवर्कर अॅपचा मुख्य उद्देश आहे.
– हे अॅप अत्यंत सुरक्षित असून, त्यात कोणतीही फसवणूक होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.
गुडवर्कर अॅप कसं काम करतं.
– नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना आता घरबसल्या नोकरी शोधता येणार आहे.
– गुडवर्कर हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी http://bit.ly/GoodWorkerApp वर क्लिक करा आणि ते डाऊनलोड करा.
– या अॅपवर युजर्सना मोफत आपला बायोडेटा तयार आणि शेअर करता येणार आहे. आपल्या भाषेत बायोडेटा तयार केला नंतर त्याचं इंग्रजी भाषेत भाषांतर केलं जाईल. नंतर तो तो कंपन्यांकडे पाठवला जाणार आहे
– जॉब मॅचिंग टूलच्या माध्यमातून योग्य नोकरीची माहिती अर्ज करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
– तुम्ही ज्या गावात तुम्ही राहात असाल किंवा जिथं नोकरीच्या शोधात असाल त्या ठिकाणच्या नोकऱ्यांबाबत माहिती दिली जाईल.
– एखाद्या कंपनीत नवीन कामगार भरती होत असेल तर त्याची माहिती हे अॅप देईल. तुमचं राहण्याचं ठिकाण आणि पात्रता यानुसार योग्य नोकऱ्यांची माहिती दिली जाईल.
– एखाद्या ठिकाणी तुमची निवड झाली तर तिथल्या मुलाखतीबाबत सर्व माहिती म्हणजे मुलाखत कधी, कुठे, किती वाजता, पगार, कंपनीच्या संबधित अधिकाऱ्याचा फोन नंबर, ईमेल आयडी अशा सर्व गोष्टींची माहिती दिली जाईल.
– गुडवर्कर अॅपवरून तुम्हाला नोकरी मिळाली तर कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र दिलं जाईल. ज्यामुळं दुसऱ्या ठिकाणी काम मिळणं सोपं जाईल. हे अॅप ही सर्व सेवा मोफत देत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद गरीबांचा मसीहा म्हणून ओळखला जाऊ लागला. हजारो गरीब मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सोनुनं मदत केली होती. तर लोकांनी सोनूच्या या आवाहनलाना भरभरून प्रतिसाद दिला आहे.