अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर. कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ नोंदवली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 600 हुन अधिक जणांना कोरोना संसर्गाचा निदान.
नगर शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांचा आकडा दीडशेहुन अधिक असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे नगरकरांना हि कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. तर आज महापालिकेने आणखी पाच ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे.
▪️ नगर शहर : 196
▪️ राहता : 83
▪️ संगमनेर : 75
▪️ कोपरगाव : 73
▪️ नगर तालुका : 30
▪️ अकोले : 25
▪️ पाथर्डी : 24
▪️ श्रीगोंदा : 21
▪️ पारनेर : 20
▪️ भिंगार शहर : 16
▪️ कर्जत : 15
▪️ श्रीरामपूर : 13
▪️ राहुरी : 07
▪️ नेवासा : 04
▪️ शेवगाव : 02
▪️ जामखेड : 01
▪️ इतर उर्वरित जिल्ह्यात : 06 जणांना कोरोना संसर्गचे निधन झाले आहे.
नगर शहरातील उपनगरात 3 ठिकाणी व केडगाव परिसरात 2 ठिकाणी सूक्ष्म कंटेन्मेंट झाेनची भर पडली आहे. त्यामुळे आता नगर शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या आता 15 झाली आहे.
🚧 कंटेन्मेंट झाेन परिसर :
➖ केडगाव भागातील अयोध्यानगर येथील श्रीराम मंदिर व परिसर
➖ केडगाव भागातीलच उदयनराजेनगर श्री रासकर यांचे घर ते कुंभार यांचे घर
➖ बालिकाश्रम रोड बोरुडे मळा, भाग्योदय रेसिडेन्सी
➖ सावेडी भागातील भाग्योदय सोसायटीचे प्रवेशद्वार
➖ सावेडी भागातील भिंगारदिवे मळा शेजारील प्रेमदान हडको वसाहतीतील श्री कल्याणकर घर यांचे घर व घराशेजारील परिसर
दरम्यान, नगर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून चार पथके तैनात केले आहे.