केंद्र सरकार देणार 1 कोटी लाभार्त्यांना मोफत गॅस सिलेंडर; कसा घेणार लाभ आणि कोण आहे पात्र जाणून घ्या!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. 1 कोटी गॅस सिलेंडर कनेक्शन मोफत देण्याची घोषणा त्यांनी उज्वला योजनेतून केली आहे. जून पासून या योजनेला गती मिळू शकते. कसा घ्यायचा याचा फायदा आणि कोणाला मिळणार लाभ जाणून घ्या:
कसा करणार ऑनलाईन अर्ज :
▪️ ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन pmujjwalayojana.com वर क्लिक करा.
▪️ होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर जाऊन क्लिक करा.
▪️ डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्जवला योजनेचा फॉर्म येईल.
▪️ आता फॉर्ममध्ये आपले नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा.
▪️ आता ओटीपी जनरेट करण्यासाठी बटनवर क्लिक करा.
▪️ यानंतर फॉर्म डाऊनलोड करा.
▪️फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीमध्ये जमा करा
यानंतर डॉक्युमेंट आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचे प्रमाण पत्र, दारिद्रय रेषेच्या खालील रेशन कार्ड आणि फोटो इत्यादी द्यावे लागतील. डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्यानंतर एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल.
काय आहेत अटी? :
▪️ भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
▪️ वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
▪️ दारिद्रय रेषेच्या खाली असावे.
▪️ कुटुंबातील महिला अर्ज करू शकतात, ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही.
▪️अशा योजनेचा लाभ अगोदर घेतलेला नसावा.