ICMR चा महत्त्वपूर्ण निर्णय! आता तुम्ही घरच्या घरी करु शकता कोरोना चाचणी
कोरोनाची चाचणी करणं आता अगदी सोपं झालं आहे. आयसीएमआरने आता घरीच कोरोना चाचणी करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. यामुळे नागरिकांना आता रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
कोरोना चाचण्या (Corona test) करण्याच्या देशात सध्या दोन प्रकारच्या पद्धती आहेत एक म्हणजे आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR TEST) आणि दुसरी म्हणजे रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid antigen test). आरटी-पीसीआर टेस्ट ही प्रामुख्याने लॅबमध्ये केली जाते. तर रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) हि विविध ठिकाणी जाऊन केली जाते. ही टेस्टखरेतर तज्ज्ञांमार्फत किंवा प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत करणे बंधनकारक आहे. पण आता काळजी नको आता तुम्हीसुद्धा स्वतःची कोरोना टेस्ट घरच्या घरी करू शकता.
आयसीएमआरकडून पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीच्या रॅपिड अँटिजन टेस्ट किटला मान्यता देण्यात आली आहे. आयसीएमआरने निर्णय जाहीर करताना ज्यांना लक्षणे आहेत, जे प्रयोगशाळेतील चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांनीच याचा वापर करावा असेही स्पष्ट केले आहे. सरसकट चाचणी करु नका असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.
दरम्यान, आता खुद्द भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएआर) घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी परवानगी दिली असून, याचा वापर कसा आणि कोणी करावा यासंबंधी आयसीएमआरकडून महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
कशी करणार घरच्या घरी स्वतःची कोरोना टेस्ट :
▪️ होम टेस्टिंगसाठी COVISELF किट आणि मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करावे.
▪️ COVISELF किटमधील स्टिक वापरून नाकातील स्वॅब घ्यायचे आहेत. ते या किटमधील एका छोट्याशा बाटलीत ठेवायचे आहे.
▪️ त्यानंतर प्रेग्नन्सी किटमधील स्ट्रिपप्रमाणे एक स्ट्रिप दिली आहे, त्यावर या स्वॅबचे नमुने टाकावेत.
𝐈𝐂𝐌𝐑 𝐢𝐬𝐬𝐮𝐞𝐝 𝐀𝐝𝐯𝐢𝐬𝐨𝐫𝐲 𝐟𝐨𝐫 𝐂𝐎𝐕𝐈𝐃-𝟏𝟗 𝐇𝐨𝐦𝐞 𝐓𝐞𝐬𝐭𝐢𝐧𝐠 𝐮𝐬𝐢𝐧𝐠 𝐑𝐚𝐩𝐢𝐝 𝐀𝐧𝐭𝐢𝐠𝐞𝐧 𝐓𝐞𝐬𝐭𝐬 (𝐑𝐀𝐓𝐬). For more details visit https://t.co/dI1pqvXAsZ @PMOIndia #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 pic.twitter.com/membV3hPbX
— ICMR (@ICMRDELHI) May 19, 2021
▪️ ज्या मोबाईलवर हे अॅप डाऊनलोड केले आहे, त्याच मोबाईलवर टेस्ट स्ट्रिपचा फोटा काढावा.
▪️ हा डेटा थेट आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टल स्टोअरवर जाईल. रुग्णाच्या गोपनीयता पूर्णपणे राखली जाणार आहे.
▪️ मोबाईल अॅपमार्फत तुम्हाला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचा देखील रिपोर्ट मिळेल.