जगभरात सध्या मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांची कमी नाहीये. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत गेम खेळण्यासाठी अक्षरशः वेडे आहेत. गेल्या वर्षी भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं काही चिनी अप्लिकेशन्स आणि गेम्सवर बंदी घातली होती. त्यात जगभरात प्रसिद्ध असलेल्या PUBG या गेमचाही समावेश होता. त्यावेळी हा गेम बंद केल्यामुळे अनेकांची निराशा देखील झाली होती.
मात्र अखेर आता प्रतीक्षा संपली!! PUBG गेमचं भारतीय व्हर्जन लाँच झाले आहे असून Battlegrounds Mobile India (BGMI) असं नाव या गेमला देण्यात आलंय. मात्र हा गेम खेळण्यासाठी यूजर्सना काही महत्त्वाच्या अटी मान्य कराव्या लागणार आहेत. कंपनीनं आपल्या सपोर्ट पेजवर यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे.
गेमसाठी या अटी महत्त्वाच्या
▪️ या गेमला लॉग इन करण्यासाठी OTP ऑथेंटिकेशन असणं महत्वाचं असणार आहे.
▪️ OTP व्हेरिफाय झाल्यानंतरच यूजर्सना गेम खेळता येणार आहे.
▪️ व्हेरिफाय कोड एंटर करण्यासाठी यूजर्सना तीन चान्स मिळणार आहेत. तीनही वेळा चूक झाल्यास पुन्हा एंटर करता येणार नाही.
▪️ एक व्हेरिफिकेशन कोड फक्त पाच मिनिटांसाठी लागू असेल.
▪️ यूजर्स फक्त दहा OTP रिक्वेस्ट करू शकतात त्यानंतर रिक्वेस्ट केल्यास 24 तासांसाठी मान्य होणार नाही.
▪️ एक फोन नंबरवरून जास्तीत जास्त दहा अकाउंट रजिस्टर केले जाऊ शकतात.
ज्यांनी या गेमचे Pre-Register केलं होतं, त्यांच्यापैकी काही जणांना हा गेम आता प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. आताही ही गेम Early Access मध्येच आहे. प्रि रजिस्टर सुरू केल्यावर 2 आठवड्यातच तब्बल 2 कोटी युजर्सनी नोंदणी केली होती. PUBG Mobile चा आधीचा गेम डेटा या नव्या गेममध्ये Migrate करण्याची सोय देण्यात आली आहे.
या गेम साठी कसा स्मार्टफोन गरजेचं?
बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडियाच्या अधिकृत Google Play Store डिटेलनुसार Battlegrounds Mobile India गेम खेळण्यासाठी तुमच्या फोनमध्ये अँड्रॉयड 5.1.1 च्या पुढचं व्हर्जन असायला हवं. 5.1.1 च्या पुढच्या OS व्हर्जन्सवरच हा गेम चालेल. तसेच फोनमध्ये 2 जीबी किंवा त्यापेक्षा जास्त रॅम असे गरजेचे.
हा गेम काही युजर्ससाठी उपलब्ध झाला असला तरी फार आनंदित होऊ नका कारण ही फक्त एक प्रारंभिक आवृत्ती (स्टार्टिंग व्हर्जन) आहे आणि बीटा आवृत्तीसाठी साइन अप केलेल्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. ट्विटरवरील काही युजर्सने स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यामध्ये हा गेम डाउनलोडिंगसाठी उपलब्ध असल्याचे दिसत आहे. स्क्रीनशॉटवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया या गेमची साईज 720MB इतकी आहे.