या करियर मधून जोपासली जाईल कलेची आवड आणि होईल बक्कळ कमाई सुद्धा!
प्रत्येकालाच सायन्स आणि कॉमर्स मध्ये रस असेल असे नाही. अनेकांना लहानपणापासूनच सरस्वती प्रसन्न असते. कलेची उपासना करण्याची अनेकांना इच्छा देखील असते.
कलेविषयी वाटणारा आदर किंवा कलेचा असणारा छंद जर करियरमध्ये बदलता आला तर याहून अधिक चांगले काय असू शकते? आज आपण अशाच एका करिअर विषयी जाणून घेणार आहोत.
ज्यात फक्त कला जोपासली जाणार नाही तर बक्कळ कमाई देखील होईल. कला क्षेत्राशी निगडित असणारा ‘कमी पैशाची नोकरी’ हा गैरसमज यातून नक्कीच पुसला जाईल.
प्रॉडक्ट डिझाईन या करिअरमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट डिझायनर असे पद, एखाद्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या ब्रँडसाठी प्रॉडक्ट डिझाईन करणाऱ्या हुद्द्यावर नोकरी मिळते.
शिक्षण
सायन्स स्ट्रीममधून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन किंवा आयआयटी कडून इंडस्ट्रियल डिझाइनचा कोर्स करुन प्रॉडक्ट डिझायनिंगच्या क्षेत्रात येऊ शकतात.
तसंच इंजिनिअरिंगनंतरही हा कोर्स करता येऊ शकतो.
प्रमुख कॉलेजेस
इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर, आयआयटी बॉम्बे
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद
एमआयटी इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन, पुणे
सिंबायोसिस इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन, पुणे
स्किल
कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्राविषयी आवड असणे गरजेचे असते. मात्र, या बरोबरच तुमच्यामध्ये त्या क्षेत्राला लागणारे स्किल आहे का, याचा विचार जरूर करायला हवा.
प्रॉडक्ट डिझायनर व्हायचे असेल तर, तुम्हाला आर्टिस्टिक व्हिजन असणे गरजेचे आहे. लॉजिकली एखाद्या डिझाईनचा विचार करून ती प्रत्यक्षात उतरवणे हे प्रॉडक्ट डिझायनर चे काम असते. तसे स्किल तुमच्याकडे असेल तर हे क्षेत्र नक्कीच तुमची वाट पाहत आहे.
हि माहिती नक्की शेअर करा..!