सध्याच्या काळात खेळाडूंचे अर्थिक उत्पन्न नेमके किती आहे? याविषयी जाणून घेण्याची इच्छा हि प्रत्येक फॅन्समध्ये असते. अनेकदा काही खेळाडूंच्या कमाईचे आकडे हे आश्चर्यचकीत करणारे असतात. जगभरात असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, जे एका सामन्यातून लाखो रुपये कमावतात. त्यांची वर्षाची कमाईही काही करोडोंमध्ये असते.
अगदी भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या विराट कोहलीची वर्षाची कमाई हि 200 कोटींच्या आसपास आहे. पण जर आपल्याला कोणी असे सांगितले की एका बॉक्सरने केवळ एका सामन्यातून तब्बल 743 कोटी रुपयांची कमाई केली, तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे खरे आहे. त्याची एका सामन्याची कमाई विराटच्या वार्षिक कमाईपेक्षा जवळपास तिप्पट होती.
अमेरिकेचा दिग्गज व्यावसायिक बॉक्सर फ्लॉयड मेवेदरने एका सामन्यातून तब्बल 100 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास 743 कोटींची कमाई केली आहे. याचा खुलासा स्वत: मेवेदरनेच केला आहे.
https://www.instagram.com/p/CQBQbuLFqbq/?utm_source=ig_web_copy_link
फ्लॉयड मेवेदर म्हणाला :
फ्लॉयल मेवेदरचा 6 जून रोजी प्रसिद्ध युट्यूबर लॉगन पॉलबरोबर प्रदर्शनीय रिंग फाईट झाली होती. या फाईटमधून मेवेदरला 100 मिलियची कमाई झाली. या फाईटनंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्याने स्वत: सांगितले होते की ही एक खोटी फाईट होती.
फ्लॉयल मेवेदर आणि लॉगन पॉल यांच्यातील सामना 8 राऊंडपर्यंत सुरु होता. खास गोष्ट म्हणजे युट्यूबर लॉगन पॉलला मेवेदर एकदाही नॉकआऊट करु शकला नव्हता.
मेवेदरचा असाही विक्रम :
मेवेदरने आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये एकाही लढतीत हार पत्करलेली नाही. त्याने 2017 मध्ये बॉक्सिंगमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. मेवेदरकडे अलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. तसेच त्याच्याकडे खाजगी जेट असून त्याची किंमत सुमारे 334 कोटी रुपये आहे. यावरून त्याच्या कमाईची कल्पना येते…