येणाऱ्या काळात तुमच्या दैनंदिन जीवनावर मोठा बदल घडणार असून, 1 जून म्हणजे आजपासूनअनेक नियमांमध्ये सुधारणा किंवा बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार आहे. म्हणूनच, या गोष्टी तुम्ही जाणून घेणे जास्त गरजेचे आहे. कोणते आहेत हे बदल? आणि काय होणार तुमच्यावर परिणाम? जाणून घेण्यासाठी हा लेख आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा!
आजपासून होणारे बदल पुढीलप्रमाणे…:
अल्पबचत योजनांच्या व्याजदरात बदल :
अल्पबचत योजनांचे व्याजदर दर तीन महिन्यांनी बदलत असतात. सरकार तसा निर्णय दर तीन महिन्यानंतर घेते.
पीपीएफ, एनएससी, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना या योजना अल्पबचत योजनांअंतर्गत येतात. 31 मार्च 2021 मध्ये नवीन व्याज दर जाहीर करण्यात आले होते. मात्र, 24 तासात सरकारने हा निर्णय मागे घेतला आता 30 जून रोजी किंवा त्या आधी अल्पबचत योजनांचे व्याजदर बदलण्याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.
एलपीजी गॅस च्या किंमतीत होणार बदल! :
1 जूननंतर एलपीजी गॅस किंमतीत सुद्धा मोठा बदल जाणवू शकतो. सध्या 800 च्या दरात या किंमती आहेत. 14.2 आणि 19 किलो अशा वेगवेगळ्या प्रकारचे एलपीजी गॅस उपलब्ध आहेत. या दोन्ही प्रकारातील किंमतीत मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत.
चेक पेमेंटमध्ये होणार बदल! :
बॅंक ऑफ बडोदा 1 जून 2021 पासून ग्राहकांच्या चेकद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंट पद्धतीत बदल होणार आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बॅंक ऑफ बडोदाकडून पॉझिटीव्ही कन्फर्मेशन बंधनकारक करण्यात आले आहे. जर एखाद्या ग्राहकाने 2 लाख रुपयांचा चेक दिला असेल तर त्या ग्राहकाला आपल्या चेकची माहिती किंवा विवरण आधी कन्फर्म करावी लागेल.
बदलणार आयएफएससी कोड :
कॅनरा बॅंकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलैपासून बॅंकेचा बदललेला आयएफएससी कोड लागू होणार आहे. सिंडिकेट बॅंकेच्या ग्राहकांना बॅंकेचा हा आयएफएससी कोड अपडेट करावा असा सल्ला देण्यात आला आहे.
यामुळे काय होणार परिणाम?
या सगळ्या बदलांचा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर असा परिणाम होणार आहे. तुम्ही जर एखाद्या अल्प बचत योजनेत स्वतःचे नाव गुंतवलेले असेल, किंवा तुम्ही तुमचे पैसे गुंतवत असाल तर, तुम्हाला देखील बदललेल्या व्याजदरानुसार त्याचा फायदा मिळेल किंवा तुमचं नुकसानही होऊ शकत. याच बरोबर चेक पेमेंटची प्रोसेस तुम्हाला माहित असणे गरजेचे ठरणार आहे. कारण, बदललेल्या चेक पेमेंट प्रोसेस मुळे तुम्ही एखादा चेक कोणाला देत असाल किंवा तुम्ही चेक क्लिअरिंग साठी देत असाल तरी देखील याबाबतचे ज्ञान तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तसेच बँकेचा आयएफएससी कोड अपडेट झाल्यानंतर तो तुम्हाला माहीत असणे तुमच्या बँकिंग प्रक्रियेसाठी गरजेचे ठरू शकते.