चुकूनही गुगल वर करू नका ‘या’ गोष्टी सर्च; यामुळे तुम्हाला खावा लागू शकते जेलची हवा
गुगलवर सर्च केल्यास राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक महत्तवपूर्ण गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहजपणे मिळते. हे सर्व बरोबर असले तरी गूगलवर काही गोष्टी सर्च न करणे हिहि फायदेशीर ठरू शकते.
प्रत्येक जण टाईमपास म्हणून किंवा एखादी कामाची महत्वपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी म्हणून अनेकदा गुगल या सर्च इंजिनचा वापर केला जातो. सहजपणे बसल्याबसल्या आपल्याला हवी ती गोष्ट आणि तिच्या विषयी ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण गुगल वर सर्चिंग सुरू करतो.
यामध्ये आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी आपल्याला सर्च करून सविस्तर कळतील असा आपला एक समज असतो. मात्र, असे असले तरी गूगलमध्ये काही अशा साध्या व सोप्या गोष्टी आहेत ज्या सर्च केल्या मुळे तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते.
कोण कोणत्या आहेत ‘या’ गोष्टी जाणून घ्या!
बॉम्ब बनवण्याची पद्धत :
अनेक लोक मजेत किंवा विनोदाचा एक भाग म्हणून बॉम्ब बनवण्याची पद्धत गुगलवर सहजपणे सर्च करतात. संभंधित व्यक्तींचे आयपी एड्रेस थेट सुरक्षा एजन्सी पर्यंत जाऊन त्या व्यक्तीला देशद्रोहाच्या आरोपाखाली देखील जेलमध्येजावे लागू शकते. कारण, तुमचा यामागे हेतू जरी वेगळा असला जरी तुम्हाला माहित असले तरी देखील, सुरक्षा एजन्सीला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे तुमचे वर्तन अयोग्य वाटू शकते. व या कारणास्तव तुम्हाला अटक देखील करू शकतात किंवा मोठा दंड देखील लागू शकतो.
कस्टमर केअर :
अनेक जण अनेकदा एखाद्या बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधत असाल तर तुम्ही सर्वांत मोठी चूक करत आहे. गुगलवर हा नंबर सर्च करणे तुम्हाला अत्यंत महागात पडू शकते. आताचच्या काळात अनेक हॅकर्स हे डमी नंबर किंवा डमी बँकेच्या वेबसाईट बनवून याविषयीची संपूर्ण तुमचा पर्सनल डेटा चोरून तुम्हाला लाखोंचे चंदन लावू शकतात. त्यामुळे कधीहि गूगलवर बँकेचा कस्टमर केअर नंबर मुळीच सर्च करू नका
कुपन कोड :
जसे कि कस्टमर केअर नंबर विषय महागात पडते तसचे कूपन कोड सर्च करणे देखील महागात पडू शकते. अनेक नवनवीन शॉपिंगच्या वेबसाईट आपल्याला कूपन कोड देतात आणि अनेक युजर्स हा कुपन कोड गुगल वर सर्च करत बसतात. यातून तुम्ही मोठी फसवले होऊ शकते किंवा खूप मोठ्या स्कॅम चा भाग देखील होऊ शकता.
इमेल आयडी :
प्रत्येकाचा एकतारी इमेल आयडी असतो आणि तो आयडी अनेक ठिकाणी लिंक असतो. गुगल वर ईमेल आयडी सर्च करणे हे देखील तुम्हाला महागात पडू शकते. असे केल्याचे तुमचे महत्त्वाचे अकाउंट लिक होऊन महत्त्वपूर्ण माहिती सहजपणे हॅकर्स पर्यंत पोहोचू शकते. यातून बराच मोठा घोटाळा देखील होऊ शकतो. यामुळे अनेक फसवणुकीच्या प्रसंगांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. त्याच बरोबर यातून एखादा मोठा स्कॅम चा देखील तुम्ही भाग झाला तर तुम्हाला नक्कीच जेलची हवा देखील खावी लागू शकते..