द्राक्ष घेण्यासाठी फार फार तर 100-150 रुपये मोजावे लागतील हा आपला ढोबळ अंदाज असतो. मात्र, जर अख्खा एक पगार केवळ एक द्राक्ष खरेदी करण्यासाठी घालावा लागला तर?? बसला ना धक्का?
काही दिवसांपूर्वी लाखो रुपयांनी विकला जाणारा आंबा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता जगातील सर्वात महागडी द्राक्ष समोर आली आहेत. आता एवढ्या महागड्या द्राक्षाची किंमत काय असेल आणि का असेल असा प्रश्न तर पडला असेलच.
अश्याच एका द्राक्षाची सर्वत्र चर्चा आहे. रुबी रोमन द्राक्ष आजकाल चर्चेचा विषय बनला आहे. याच्या एक दाण्यासाठी तुम्हाला तुमच्या महिन्याला मिळणारा पगार खर्च करावा लागतो. ही द्राक्ष इतकी दुर्मिळ आहेत की या द्राक्षाचे वर्षभरात केवळ 2400 घोस निर्माण केले जातात.
याची क्वालिटी चांगली असते आणि गॅरंटी देखील दिली जाते. ही द्राक्षे बाजारात येताना विशिष्ट प्रोसिजर फॉलो केली जाते. त्याचे सर्टिफिकेशन केले जाते.
काय आहे या द्राक्षात असं खास?
रुबी रोमन ग्रेप्स असं या द्राक्षाचं नाव आहे. ही द्राक्षांची अत्यंत दुर्मीळ प्रजाती आहे. दरवर्षी रुबी रोमनचे केवळ 2 हजार 400 घोसांचं उत्पादन घेतलं जातं. पिंगपाँग बॉलएवढ्या प्रत्येक द्राक्षाचं वजन 20 ग्रॅम असतं तर इतकच नाही तर 3 सेमी पर्यंत या द्राक्षाचा आकार असू शकतो असा दावा आहे.
भारतात किती रुपयांना मिळतात ही द्राक्षं?
या द्राक्षाचा एक लहानसा घोस 7 लाख 50 हजारांच्या घरात जातो. बाजारपेठेत फळ विक्रीसाठी येतं, तेव्हा त्याला सर्टिफाय करण्यात येतं. त्यासाठी खास नियमही तयार करण्यात आलेत.