आज प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास व्हाट्सॲप बंद होणार का? असे न केल्यास पडू शकते महागात
मागील काही काळापूर्वी व्हॉट्सॲप आणि व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसी मध्ये होणारा बदल आणि त्यामुळे युजर्स चा मोबाईल मधील डेटा ॲप कडे जाण्याच्या घटना आपण सर्वांनीच सातत्याने वाचल्या आहेत किंवा अनेकदा पहिल्या देखील आहे.
व्हॉट्सॲप वापरणे बंद करावे लागणार म्हणल्यावर अनेक जण हैराण झाले आहे तर प्रायव्हसी धोक्यात येणार अशा चर्चेचे अनेक नवनवीन विषय समोर देखील येत आहे. मात्र व्हाट्सॲप आता पूर्ण बंद होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तरी देखील व्हाट्सअँप मधील काही महत्त्वपूर्ण फिचर वापरता येणार नाही.
📍 या सेवांवर येणार बंदी -:
▪️ चॅट लिस्ट चा वापर करता येणार नाही.
▪️ व्हाट्सॲप ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचे उत्तर देता येईल.
▪️ पॉलिसी स्वीकारण्यासाठी वारंवार रिमाइंडर पाठवले जाईल.
▪️ तरी देखील पॉलिसी न स्वीकारल्यास 100 दिवसांनी
▪️ तुमचे अकाउंट डिलीट होईल.
▪️ अकाउंट डिलीट केल्यास कोणताही बॅकअप मिळणार नाही. पुन्हा ते अकाउंट सुरू करता येणार नाही.
📍 व्हॉट्सॲपला काही लोकप्रिय पर्याय -:
▪️ Telegram : खऱ्या अर्थाने हा सर्वोत्तम पर्याय म्हणता येईल. बऱ्याच बाबतीत व्हॉट्सॲपपेक्षा चांगल्या सुविधा!
▪️ Signal : ओपन सोर्स आणि सर्वात सुरक्षित मेसेजिंग ॲप. प्रायव्हसीसाठी सर्वोत्तम.
▪️ Discord : प्रामुख्याने गेमिंगसंबंधित वापर पण अलीकडे नव्या सोयीमुळे सर्वांना वापरण्यासाठी चांगला पर्याय.
▪️ Snapchat : आधीपासून लोकप्रिय पण भारतात तुलनेने कमी वापर
▪️ Skype : ही मायक्रोसॉफ्ट सेवा व्हीडिओ कॉलिंग सारख्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे पुरवते
▪️ यासोबत इतरही अनेक पर्याय आहेत.