आता तुम्ही हि लपवू शकतात तुमची व्हॉट्सअॅप चाट; यासाठी व्हॉट्सअॅप घेऊन आले भन्नाट फिचर!
आजकालच्या काळात सर्वच जण व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. एखाद्याशी गप्पा मारण्यासाठी किंवा फोटो आणि व्हिडिओ शेयर करण्यासाठी व्हॉट्सअॅप हे महत्त्वाचे स्रोत मानले जाते. इतकेच नव्हे तर अनेकदा व्हॉईस कॉलपासून ते व्हिडिओ कॉलिंगपर्यंत, व्हॉट्सअॅपने आता सगळं काही ते सोपे केले आहे. व्हॉट्सअॅप देखील आपल्या वापरकर्त्यांच्या वेळोवेळी गरजेनुसार अनेक भन्नाट फिचर घेऊन येत असतो.
आता असेच एक फिचर व्हॉट्सअॅप घेऊन आला आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा व्हॉट्सअॅप चाट सिक्रेट ठेवायचा मदत करू शकतो. अनेकदा आपल्याला कुणी दुसरी व्यक्ती आपला व्हॉट्सअॅप वरचा मेसेज वाचणार तर नाही ना, याची भिती सगळ्यांनाच असते. तर आपल्या प्रिय व्यक्तींसोबत आपण जे काही बोलतो ते आपण इतरांसोबत कधीहि शेअर करू इच्छित नाहीत.
व्हॉट्सअॅप चॅटला सुरक्षित करण्यासाठी कधीही कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची आवश्यकता मोबाईल भासत नाही. आज आम्ही अशाच सोपी पद्धत सांगणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला व्हॉट्सअॅप अकाऊंटची सर्व गोपनीयता वाढविता येईल..
आता व्हाट्सअँप आपल्या नव्या अपडेटमध्ये इन अँप एक फिचर आणले आहे. जे तुमचे संपूर्ण चॅट सुरक्षित ठेवेल. चला तर मग जाणून घेऊया या याविषयी सोपी ट्रिक्स….
या पद्धतीने लपवू शकतात चॅट्स :
▪️ सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅप ओपन करा.
▪️ व्हॉट्सअॅप वर गेल्यानंतर होम पेजवर तुम्हाला वरच्या बाजूला उजवी कडे तीन डॉट्स दिसतील, यावर क्लिक करा.
▪️ यानंतर आपल्याला काही पर्याय दिसतील त्यामधील Settings या पर्यायावर क्लिक करा.
▪️ यानंतर तुमच्या स्क्रीनवर Account असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
▪️ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर Privacy हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
▪️ Privacy मध्ये तुम्हाला शेवटी फिंगरप्रिंट लॉक दिसेल. Unlock fingerprintर क्लिक करा. यानंतर आता तुम्हाला फिंगरप्रिंट नोंदणी करण्यास सांगितले जाईल.
▪️ fingerprint नोंदवताच, तुमच्या सोयीनुसार फिंगरप्रिंट लॉकची वेळ निश्चित करण्यास सांगतले जाईल.
▪️ यामध्ये तुम्हाला तीन नवे पर्याय मिळतील, त्यामध्ये तुमच्या सोयीनुसार तुम्ही Immediately, After 1 minute, आणि After 30 Minutes या तीनपैकी तुम्ही कोणताही एकाची निवड करु शकता.
▪️ यामध्ये आता तुम्ही Immediately हा पर्याय निवडलात तर व्हॉट्सअॅप बंद होताच तुमचं लॉक अॅक्टिव्हेट होईल. तर After 1 minute, After 30 Minutes यापैकी कोणताही एक पर्याय निवडल्यानंतर अनुक्रमे 1 मिनिट किंवा 30 मिनिटांनंतर तुमचं लॉक अॅक्टिव्हेट होईल.