मार्च महिना हा आर्थिक वर्षातला शेवटचा महिना असतो. या महिन्यात बँकांची कामं जास्त वाढतात. मात्र यावर्षी मार्च महिन्यात खूप दिवस बँका बंद राहणार असलेच चित्र दिसू लागले आहे.
त्यामुळे बँकेची कामं करण्यासाठी आजच योग्य वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार (RBI) महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्याचबरोबर मार्च महिन्यात काही अतिरिक्त सुट्ट्या आणि स्थानिक सण देखील आहेत. त्यामुळे त्या दिवशी देखील बँक बंद असतील.
बँकांना असलेल्या सुट्ट्या खालीलप्रमाणे :
● 5 मार्च : शुक्रवार, फक्त मिझोरममध्ये सुट्टी
● 7 मार्च : रविवार
● 11 मार्च : गुरुवार, महाशिवरात्री
● 13 मार्च : दुसरा शनिवार
● 14 मार्च : रविवार
● 21 मार्च : रविवार
● 22 मार्च : सोमवार, बिहार दिन, फक्त बिहारमध्ये सुटी
● 27 मार्च : चौथा शनिवार
● 28 मार्च : रविवार, होळी
● 29 मार्च : सोमवार, धूलिवंदन
● 30 मार्च : मंगळवार, राजस्थान दिवस
ग्राहकांवर काय होणार परिणाम ?
बँका बंद असल्याच्या दिवशी ग्राहकांना फक्त ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांचे डीडी आणि चेक क्लीअर होणार नाही. त्यामुळे पैशांसाठी ATM सेवा मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ शकते. या सेवेवरील ताण यामुळे वाढू शकतो.
टिपणी : प्रत्येक शहर व प्रत्येक राज्यांनुसार सुट्ट्यांचे गणित कदाचित वेगळे असू शकते, हे लक्षात घ्यावे. व त्यानुसार काम करण्यासाठी आजच योग्य वेळापत्रक तयार करावे.
हि माहिती नक्की शेअर करा..!