जगासह भारतातही थैमान घातलेल्या कोरोना महामारीच्या संसर्गनंतर आता अनेक देश लस बनवण्यास सर्वात करा आहे. तर भरपूर देशांनी ही लस तयार देशील केली आहे. या मध्ये भारतदेश देखील आहे. भारतात दोन लशींना मान्यता दिली असून, त्याचे लसीकरण मोहिमपण सरकारने हाती घेतली आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यातील तयारीच्या दरम्यान केंद्र सरकारने रुग्णालयांची यादी जाहीर केली. हा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू होणार आहे.
कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी या प्रक्रियेत अधिक संख्येने खासगी रुग्णालयांचा समावेश केला आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत जवळपास 10 हजार खासगी रुग्णालये आणि 600 सीजीएचएस रुग्णालये केंद्र सरकारने बनविली आहे, असे सांगतले जाते.
महाराष्ट्रातील 775 खासगी रुग्णालयांना परवानगी :
अहमदनगर 35
अकोला 13
अमरावती 11
औरंगाबाद 34
बीड 20
भंडारा 07
बुलडाणा 15
चंद्रपूर 08
धुळे 15
गडचिरोली 02
गोंदिया 06
हिंगोली 05
जळगाव 28
जालना 14
कोल्हापूर 39
लातूर 13
मुंबई, मुंबई उपनगर 34
नागपूर 30
नांदेड 17
नंदुरबार 04
नाशिक 40
उस्मानाबाद 09
परभणी 04
पुणे 55
रायगड 14
रत्नागिरी 06
सांगली 27
सातारा 22
सिंधुदुर्ग 07
सोलापूर 36
ठाणे 62
वर्धा 03
वाशिम 10
यवतमाळ 15
शासनाने आयुष्मान भारत योजनेंतर्गत पॅनेलमध्ये समाविष्ट केलेल्या रुग्णालयांची यादीसाठी https://pmjay.gov.in/covid-vaccination-hospitals या संकेतस्थळावर क्लिक करा.
लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोणत्याही आजार असणार्यांना 1 मार्चपासून सरकारी केंद्रांवर एंटी-कोरोना महामारी विषाणूची लस मोफत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना यासाठी खासगी दवाखाने आणि केंद्रांवर पैसे द्यावे लागतील असे सांगतले आहे.
दरम्यान, याआधी सरकारकडून पहिली कोरोना लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरु झाली आहे. तर आतापर्यंत 1,07,60000 हुन अधिक लोकांना लस देण्यात अली आहे. तर 14 लाख लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशाप्रकारे लसीकरण मोहीम सरकारने केली असून पुढील लसीकरणासाठी योग्य ते नियोजन केलेले आहे.