New Mahindra Bolero Neo  : प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीला देशात ओळख मिळवून देण्यात महिंद्रा बोलेरो आणि महिंद्रा स्कॉर्पिओ या दोन गाड्यांचा सिंहाचा वाटा आहे. कंपनी आता या दोन्ही कार नव्या अवतारात लाँच करणार आहे. नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ ही कार स्कॉर्पिओ एन (Scorpio N) या नावाने या महिन्याच्या अखेरीस लाँच केली जाणार आहे. तर महिंद्रा बोलेरो निओ (Bolero Neo) ही कार देखील नव्या अवतारात लाँच केली जाणार आहे. कंपनी बोलेरो निओचं अपडेटेड व्हर्जन लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार या वर्षाच्या अखेरीस बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. नवीन मॉडेलची खास गोष्ट म्हणजे ही कार ७ ऐवजी ९ सीटर मॉडेल असेल. कंपनीने जुलै २०२१ मध्ये पहिल्यांदा बोलेरो निओ कार लाँच केली होती.

दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, नवीन एसयूव्हीला महिंद्रा बोलेरो निओ प्लस असं नाव देण्यात आलं आहे. नवीन बोलेरो निओ प्लस हे पूर्णपणे नवीन प्रोडक्ट नसेल. ही कार टीयूव्ही ३०० प्लस एसयूव्हीचं (TUV300 Plus SUV) अपडेटेड मॉडेल असेल. ही कार गेल्या वर्षी एप्रिल 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली होती.

Share.