आपल्या परिसरात वीजबिल जास्त येते ही अनेकांची तक्रार नेहमीची असते. अनेकदा त्याविरोधात तक्रार करून आपण ते कमीही करून घेण्याचं किंवा करून घेतले असेल. यावरच काही उपाय म्हणून महावितरणने मोबाईल ॲप व वेबसाईटद्वारे वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची मोठी सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्याची खास सोय उपलब्ध करून दिली आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात सध्या संचारबंदी सुरु आहे. तर काही ठिकाणी कडक लॉकडाउन देखील लावण्यात आला आहे. तर तसेच अनेक भाग किंवा मोठमोठ्या सोसायट्या प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
तर अश्या प्रतिबंधीत क्षेत्र महावितरणला मीटर रिडींग घेणे शक्य न झाल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतरही वीजग्राहकांना महावितरण मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. प्रत्येक महिन्यामध्ये रिडिंगसाठी निश्चित केलेली अंतिम तारीख देखील ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे.
मीटर क्रमांक देखील नमूद आहे. रिडींगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे.
हा मेसेज मिळाल्यापासून पुढील चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारे, मेसेजद्वारे आपले घराचे किंवा व्यवसायचे ठिकाणचे रिडींग पाठविता येईल. आपण ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्यासाठी ग्राहकांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक असते. या नोंदणीकृत मोबाईलवर मीटर रिडींग पाठविण्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविणे देखील आवश्यक आहे.
वीजग्राहकांनी MREAD<स्पेस><12 अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस> असा ‘एसएमएस’ 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे.
चुकीचे व मुदतीनंतर पाठविलेले मीटर रिडींग स्वीकारण्यात येणार नाही व ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्याची सोय केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध राहणार आहे.