सध्याच्या काळात मोबाईल ही एक काळाची गरज झालेली असली तरीदेखील व्हॉट्सॲप ही अक्षरशः सवय झाली आहे. दोन लोकांना किंवा एका व्यक्तीला तिच्या नातेवाईकांशी कनेक्ट ठेवण्यासाठी व्हॉट्सॲप सारखे दुसरे माध्यम सध्या तरी अस्तित्वात नाही असे म्हणे काय चुकीचे ठरणार नाही. व्हॉट्सॲपला पर्याय असला तरीदेखील लोकांना व्हॉट्सॲपची झालेली सवय आणि वाटणारी आपुलकी ही इतर ॲप बाबत वाटत नाही
व्हॉट्सॲप नेहमीच वेगवेगळे फिचर किंवा काही नियम त्याच्या युजर्ससाठी आणत असते. यावर्षी देखील काही नियम व्हॉट्सॲपने आणले होते. यावर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रायव्हेसी पॉलिसीवरून व्हॉट्सॲपला टीकेचा सामना करावा लागत होता. व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसी यावर्षीच्या सुरवातीला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात लागू होणार होती, मात्र काही कारणास्तव आता 15 मे 2021 ला लागू होणार आहे.
काही नवीन विवाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू करण्याची तारीख टाळली होती. नवीन पॉलिसीबाबत देखील कंपनी सातत्याने यूजरला नॉटिफिकेशन पाठवत येत होत्या. मात्र, जर तुम्ही ही पॉलिसी स्विकारली नाही तर ?
कंपनीने अनेकदा या पॉलिसी लागू करण्याची तारीख पुढे ठाकली आहे, मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्याची शक्यता खूप कमी आहे. कंपनीने अनेकदा स्पष्ट केले आहे की 15 मे पर्यंत जे यूजर पॉलिसी स्विकारणार नाहीत, त्यांना मेसेज करता येणार नाही. थोडक्यात, जोपर्यंत पॉलिसी स्विकारत नाही, तोपर्यंत व्हॉट्सअॅपच वापरता येणार नाही.
काय सांगतले व्हॉट्सॲपचे धोरण :
युझर्सना व्यक्तिगत माहिती संकलित करण्याची परवानगी व्हॉट्सॲपला देणे बंधनकारक ठरणार.
ही व्यक्तिगत माहिती व्हॉट्सॲप तिची पॅरेंट कंपनी असलेल्या फेसबुकला देणार आहे.
फेसबुक या माहितीचा वापर व्यवसायवृद्धीसाठी करणार
15 मे नंतर नेमके काय? :
व्हॉट्सअॅपने अनेकदा सांगितले आहे की जर काही अटी तुम्ही मान्य करत नाही तोपर्यंत यूजर मेसेज सेंड अथवा रिसिव्ह करू शकत नाही.
जे या नवीन अटींचा स्विकार करणार नाही, त्यांचे अकाउंट इनएक्टिव्ह होईल व 120 दिवसानंतर बंद होऊन जाईल.
या नवीन पॉलिसीला सर्वाधिक विरोध भारत देशातून होत आहे. भारतात कंपनीचे सर्वाधिक यूजर आहेत.
तर व्हॉट्सअॅप नवीन पॉलिसी अंतर्गत पॅरेंट कंपनी फेसबुकला अधिक डेटा शेअर करत असल्याचा आरोप आहे. मात्र व्हॉट्सअॅपने मात्र हे आरोप फेटाळत, अपडेट बिझनेस अकाउंटशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.