कोरोना संकटामुळे आर्थिक क्षेत्रावर मंदीचे सावट पसरले आहे. अशा असुरक्षित वातावरणात सोन्याची झळाळी फिकी पडताना दिसत आहे. गुंतवणूकदार भांडवली बाजाराकडे वळले आहेत. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक कमी झाल्याचे दिसत आहे. आज (रविवारी) सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे.
गेल्या आठवड्यात सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाले होते. मात्र, आजच्या दिवशी सोन्याच्या भावात पुन्हा घट झाल्याचे दिसून आले.
शुक्रवारी MCX वरील सोन्याच्या किंमती किंचित वाढीसह बंद झाल्या. शुक्रवारी बाजारात सोन्याचा दर 324 रुपयांनी वाढून 47587 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. तथापि, यावेळीसुद्धा सोन्याच्या आतापर्यंतच्या उच्च विक्रमांपेक्षा जवळपास 9000 रुपयांनी स्वस्त दर मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने ऑल टाइम हाय रेकॉर्ड केला होता. त्यावेळी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 56,200 रुपयांच्या पातळीवर गेले होते.
शुक्रवारी सोन्याच्या वाढीसह मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ट्रेडिंग बंद झाले. याशिवाय सोन्याचा ऑगस्टचा वायदा 300.00 रुपयांनी वाढून 47,339.00 रुपयांच्या पातळीवर झाला. त्याचबरोबर चांदीचा जुलै वायदा 1004.00 रुपयांनी वाढून 69,159.00 रुपयांवर बंद झाला.
सोन्याचे दर घटणार की वाढणार काय म्हणतात एक्सपर्ट?
सोन्याच-चांदीत गुंतवणुकीची वेळ आहे का? याबाबत तज्ञांचे म्हणणे आहे की सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सोन्याता येत्या काही महिन्यात 60 हजारांचा टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याने सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर ओढावल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. मात्र, देशात अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत असताना पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यामुळे पुन्हा अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.