सध्या देशभरात कोरोना महामारीच्या हाहाकार: सुरु आहे. या महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन लावण्यात आले आहे, त्यामुळे अनेक लोक घरीच आहेत. तर अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ (work from home) चालू आहे. या कठीण काळात ऑफिसचं काम करण्यासाठी परवडणारा रिचार्ज प्लॅन (recharge plan) असणं देखील तितकाच महत्वाचं झाले आहे.
तर मागील एकवर्षां हुन अधिक काळ वर्क फ्रॉम होम करणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी भारतीय टेलिकॉम कंपन्या सातत्याने नवनवे प्लॅन्स सादर केले आहे. आता असच एक खास प्लॅन JIO / Airtel / आणि VI घेऊन आले आहे. यामध्ये ग्राहकांना एकावर एक फ्री रिचार्ज ऑफर मिळणार आहे. यामुळे नक्कीच या सर्व कंपन्यांच्या आपल्या युजर्सची मनं जिकंली आहेत.
जाणून घेऊया या खास प्लॅन विषयी :
Reliance Jio :
मुकेश अंबानींच्या जिओ ने ग्राहकांसाठी 6 डबल बेनिफिट्स रिचार्ज प्लॅनची आणले आहे. म्हणजेच तुम्ही या प्लॅन मध्ये रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला त्याच डबल फायदा होणार आहे. साधारणतः जिओच्या 39 रुपये, 69 रुपये, 75 रुपये, 125 रुपये, 155 रुपये आणि 185 रुपयांच्या प्लॅनवर तुम्हाला डबल व्हॅलिडीटी मिळेल.
जिओने सांगितल्याप्रमाणाने…: आता पर्यंत 39 आणि 69 रुपयांच्या रिचार्जवर 14 दिवसांची वैधता होती, नवीन प्लॅननुसार ती आता 28 दिवस करण्यात आली आहे. तसंच या 39 रुपयांत आधी 100 MB डेटा मिळायचा तो आता 200MB वाढवला आहे, तर 69 रुपयांत मिळणारा 0.5 GB डेली डेटा हा 1GB पर्यंत वाढवण्यात आला आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शन देखील मिळतं.
Vodafone-Idea (VI) :
वोडाफोन ने आपल्या ग्राहकांसाठी त्यांच्या लो-इनकम अंतर्गत ग्रुप युजर्सना 49 रुपयांचा फ्री रिचार्ज देत आहे. कंपनीकडून डबल बेनिफिट्स प्लॅन अंतर्गत या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100MB डेटा आणि 38 रुपयांच्या टॉक टाइमसह 28 दिवसांची व्हॅलिडीटी दिली जात आहे. याशिवाय कंपनीच्या 79 रुपयांच्या प्लॅनमध्ये डबल बेनिफिट (double benefit ) अंतर्गत 128 रुपयांचा टॉकटाइम (talk time) आणि 200MB डेटासह 28 दिवसांची व्हॅलिडीटी दिली जात आहे.
Airtel –
वोडाफोन प्रमाणेच..: Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी खास डबल बेनिफिट्स असणारे दोन फायदेशीर रिचार्ज प्लॅन आणले आहेत. जे 79 आणि 128 रुपयांचे आहेत. 128 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 200MB डेटा आणि 128 रुपयांचा टॉक टाइम मिळेल. तर या प्लॅनची वैधता हि 28 दिवस इतकी असेल.
तर एवढेच नाही तर कोरोना संकटात कंपनी ग्राहकांसाठी त्यांच्या लो-इनकम ग्रुप प्रीपेड युजर्सना 49 रुपयांचा फ्री रिचार्ज देखील देत आहे. त्यामध्ये ग्राहकांना प्रामुख्याने 100MB डेटा आणि 38 रुपयांचा टॉक टाइम दिला जातोय. 49 रुपयांच्या या फ्री रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी हि 28 दिवसांची असले अशी माहिती कंपनीने दिली आहे.