महिला सबलीकरणावर अनेकदा बोलले जाते. मात्र, प्रत्यक्षात आपण काय पावलं उचलतो हे महत्वाचे आहे. ‘आधारशिला’ नावाची योजना एलआयसी 8-55 वर्षीय महिलांसाठी चालवते. यात दररोज 29 रुपये गुंतवणूक करून 3.5 लाख रुपये मिळू शकतात. ही पॉलिसी संरक्षणासह चांगले कव्हरेज सुद्धा देते आणि वर पॉलिसीधारक महिला मृत्युमुखी पडल्यास कुटुंबाला आर्थिक मदत केली जाते.
योजनेचा हेतू काय?
एलआयसीची आधारशिला खास महिलांसाठी तयार केलेली पॉलिसी आहे. यूआयडीएआयने आधार कार्ड जारी केलेल्या महिलांसाठी हे धोरण तयार केले गेलेय. ही हमी परतावा देण्याची योजना आहे. यामध्ये तुम्हाला बोनस सुविधेचा लाभ देण्यात येईल. या योजनेत तुम्हाला बचत तसेच संरक्षणाची सुविधा एकाच वेळी मिळेल. या गुंतवणुकीसाठी एलआयसी शाखा किंवा एजंटशी संपर्क साधता येईल.
एलआयसीची ही पॉलिसी संरक्षणासह चांगले कव्हरेज देते
या मध्ये किमान विमा रक्कम 75,000 आणि कमाल 3 लाख मिळतात. या पॉलिसीची मुदत 10-20 वर्षे असते.योजनेचा हेतू हा महिलांचे सबलीकरण आहे. हमी परतावा देणारी ही योजना आहे. यात बोनस सुविधा आणि बचतीसह संरक्षणाची सोय आहे.
एखाद्या महिलेने 31व्या वर्षी पॉलिसी घेतली तर, 20 वर्षांसाठी रोज 29 रुपये जमा करून पहिल्या वर्षाचे प्रीमियम 4.5% करासह 10,959 रुपये असेल. पुढील प्रीमियम 2.25% ने 10,723 असेल. यामध्ये तुम्हाला 2 लाख 14 हजार 696 रुपये जमा करावे लागतील. 20 वर्षाने 3.97 लाख तुमच्या खात्यावर जमा होतील!
पॉलिसी 15 दिवसांत रद्द केली जाऊ शकते
पॉलिसी घेतल्यानंतर एखाद्याला ती रद्द करायची असल्यास एलआयसी देखील ही सुविधा प्रदान करते. या अंतर्गत आपण योजना घेतल्यानंतर 15 दिवसांच्या आत रद्द करू शकता.