आजकालच्या जमान्यात प्रत्येकाचा स्मार्टफोन वावर वाढला आहे. स्मार्टफोन हा जितका सोपा, सोयीचा आणि अति गरजेचा आहे. तसा स्मार्टफोनचा चुकीचा वापर देखील गंभीर ठरू शकतो. अनेकदा स्मार्टफोन बद्दलच्या अनेक तक्रारी समोर येत असून स्मार्टफोनमुळे काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
आता पर्यंत मोबाईलच्या सर्वात जास्त घातक घटना या मोबाईल बॅटरी फुटून गंभीर परिणाम झाल्याचे आल्या आहे. कधीही मोबाईल फोन चार्जिंगला लावला असताना, त्याचा वापर करणं धोकादायक ठरू शकते. या पासून नेमके काय होऊ शकते ते पाहूया….
फोन चार्जिंगला असताना करू नका या गोष्टी –
▪️ कधीही चुकूनही मोबाईलची बॅटरी चार्ज होत असताना, तुम्ही फोनवर बोलणं, गेम खेळणं आणि सिनेमा पाहणे या धोकादायक गोष्टी कधीही करू नयेत. यावेळी कदाचित तुम्ही फोनसह तुम्ही स्वत:लाही देखील धोक्यात टाकत असता. त्यामुळे फोन पूर्ण पणे चार्ज होई पर्यंत त्याचा वापर कोणत्याही कामासाठी करू नये.
▪️ तुम्ही झोपताना कधीही फोन तुमच्या उशीखाली ठेवून झोपू नका. किंवा तुमचा स्मार्टफोन कधीही रात्रभर चार्जिंगला लावून तसाच ठेवू नका. ओव्हर चार्जिंगमुळेही बॅटरीमध्ये समस्या निर्माण होतात.
▪️ फोनमध्ये कंपनीच्या बॅटरी शिवाय कोणत्याही लोकल कंपनीची बॅटरीचा वापर करू नका. यामुळे फोन फ़ूटण्या सारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.
▪️ फोन काही वेळेस अतिशय गरम होतो, अशा परिस्थितीत त्याचा वापर करणे धोकायचे ठरू शकते. फोनच्या सेटिंगमध्ये ज्या अँप च्या वापरसाठी सर्वात जास्त बॅटरी वापली जाते, ते अँप तात्काळ बंद करा.