‘या’ ठिकाणी मिळणार फक्त 1 रुपयात ऑक्सिजन; तुम्हाला करावे लागेल फक्त एवढेच ; वाचा….
कोरोना (coronavirus) महामारीच्या दुसऱ्या लाटेचा देशात उद्रेक सुरु आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य सुविधेवर देखील अतिरिक्त ताण पडत आहे. याशिवाय वाढत्या कोरोनारुग्ण संख्येसोबतच ऑक्सिजनचा तुटवडा प्रामुख्याने जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता दोन स्वयंसेवी संस्था (NGO) पुढे आल्या असून, ते केवळ 1 रुपयामध्ये ऑक्सिजन देत असून अनेकांचे प्राण वाचवत आहे.
नोएडा येथील दोन स्वयंसेवी संस्था (एनजीओ) एक म्हणजे चॅलेंजर्स ग्रुप आणि वॉइस ऑफ स्लमने जे कोरोनारुग्ण आपल्या घरीच उपचार घेत आहे त्यांच्यासाठी या दोन संस्थाने आपला मदतीचा हात पुढे केला आहे. ज्या रुग्णाची आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या लोकांना या एनजीओ केवळ 1 रुपयांमध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून देत आहे. हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर हे रुग्णसाठी फक्त 10 ते 15 दिवसांसाठी उपलब्ध केले जाते.
यासाठी काय करावे लागेल :
सर्वप्रथम वॉइस ऑफ स्लमचे संस्थापक ‘देव प्रताप’ (Dev pratap) यांनी सांगितले कि, आता कंपनीने 50 कॉन्संट्रेटर मागवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे कंपनकडून मोठ्या प्रमाणात कॉन्संट्रेटरची ऑर्डर देण्यात आली आहे. तर चॅलेंजर्स ग्रुपचे अध्यक्ष प्रिन्स शर्मा देखील म्हणाले की, गरजू लोक ऑक्सिजन कॉन्संट्रेटरसाठी आम्हाला Challengersgroupofficial@gmail.com किंवा वॉइस ऑफ स्लमचा मेल आईडी Info@voiceofslum.org यावर संपर्क करू शकतात.
चॅलेंजर्स ग्रुपचे अध्यक्ष ने सांगतले कि, अर्ज करणाऱ्या लोकांना सर्वप्रथम रुग्णाचे आधार कार्ड, ऑक्सिजन सॅच्यूरेशन रिपोर्ट, कोरोना रिपोर्ट, डॉक्टरची रिसिप्ट आणि कुटुंबातील व्यक्तीचे ओळखपत्र व मोबाइल नंबर हा मेल वर पुरावा म्हणून द्यावे लागेल. एनजीओकडून रुग्णाचे संपूर्ण डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर कंपनीकडून ऑक्सिजन उपलब्ध केले जाईल असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसंपासून महामारीच्या संकटात मेडिकल ऑक्सिजन हे प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात अनमोल गोष्ट झाली आहे.