घरबसल्या काहीही मिळत नाही असा समज वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. मात्र, आता तुमच्यातील नावीन्य आणि कला तुम्हाला घरबसल्या 15 लाख मिळवून देणार आहे. एका वित्तीय संस्थेच्या विकासाकरिता माय गव्हर्नमेंट इंडियाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या संस्थेला नाव, टॅगलाईन आणि लोगो डिजाईन करून देऊन तुम्ही 15 लाखाचे बक्षीस जिंकू शकणार आहात.
My Gov India च्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी वेळेवर मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. यासाठी आपण 15 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करू शकता. या स्पर्धेत जो विजयी होईल त्याला पुरस्कार म्हणून 15 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
काय आहे स्पर्धा आणि नियम जाणून घ्या:
वित्त सेवा मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाने डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिटय़ूट (DFI) साठी संस्थेचे नाव, त्यासाठी एक टॅगलाइन आणि लोगो डिझाइन सुचविण्यासाठी लोकांना आमंत्रित केले आहे. नाव, टॅगलाइन आणि लोगोमध्ये डेवलपमेंट फाइनेंशियल इंस्टीट्यूशनच्या स्थापनेमागील हेतू दर्शविणे आवश्यक आहे. हे तीनही नावे, टॅगलाइन आणि लोगो वेगवेगळे असावेत, परंतु या तीन्हीमध्ये साम्य असणे गरजेचे आहे.
अशी करा नोंदणी
* आधी mygov.in पोर्टलवर जाऊन नोंदणी करून घ्यावी
* लॉग इन टू पार्टीसिपेट वर क्लिक करून सर्व माहिती भरावी
* नोंदणी झाल्यावर आपली एंट्री सबमिट करावी..
Put on your creative hat and stand a chance of winning a cash prize of ₹5,00,000 for each category!
Participate in Name, Tagline and Logo contest for Development Financial Institution.
Visit: https://t.co/VdrHvzPCEb@PMOIndia @FinMinIndia @PIB_India @MIB_India pic.twitter.com/QVlfJ55Y7B
— MyGovIndia (@mygovindia) July 27, 2021
असे असेल बक्षीसाचे स्वरूप
या स्पर्धेत संस्थेचे नाव सुचविण्याकरिता
पहिले पारितोषिक 5,00,000 रूपयांचे असणार आहे.
द्वितीय पारितोषिक 3,00,000 रुपयांचे असणार आहे.
तृतीय पारितोषिक 2,00,000 रुपयांचे असणार आहे.
टॅगलाईनसाठी
पहिले बक्षीस 5,00,000 रुपयांचे असणार आहे.
दुसरे बक्षीस 3,00,000 रुपयांचे असणार आहे
तिसरे बक्षीस 2,00,000 रुपयांचे असणार आहे.
लोगोसाठी
पहिले पारितोषिक 5,00,000 रुपयांचे असणार आहे.
दुसरे पारितोषिक 3,00,000 रुपयांचे असणार आहे.
आणि तृतीय पारितोषिक 2,00,000 रुपयांचे असणार आहे.